Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनुदान वाटपाचा कालावधी संपला तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान नाहीच !

गणेश सूळby गणेश सूळ
Sunday, 17 March 2024, 18:17

गणेश सुळ

केडगाव  : राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीसाठी दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पण अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, ता विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत.

राज्यात बहुतांश भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाकडे पाहत आहे. परंतु, दुधाचे पडलेले भाव यामुळे बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दूध अनुदान वाटपाचा एक महिन्याचा कालावधी संपला असून, ११ फेब्रुवारीपासून परत गायीच्या दुधाचा दर ३.५ फॅटसाठी २७ रुपये झाला आहे. काही संस्थांनी दुधाचा दर २६ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे दूध अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरले आहे. अजून कुठल्याच दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्‍न ‘जैसे थे’च राहिला आहे.

 

दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा; शेतकऱ्यांची मागणी

राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, शिवाय दुधाला नैसर्गिकरीत्या दरात वाढ मिळत नाही. तोपर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अगोदरच वैरण आणि पशुखाद्यावरील खर्चात मोठी वाढ झाली असल्याने दूध व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनुदान कालावधी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांचे दूध व्यवसायातील आर्थिक गणित जुळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान अजून मिळाले नाही. दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपल्याने २५ ते २६ रुपयाने दूध दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दूध अनुदान जमा करावे व दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवावा.

– गणपत लव्हटे, मा. चेअरमन, जय मल्हार दुध उत्पादक संस्था, देलवडी

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

एक व्हिडिओ, राग अनावर अन् हल्ला! नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31
Next Post
Devendra Fadnavis criticized Sharad Pawar and uddhav Thackeray in mumbai

‘सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, आदित्य ठाकरेंमुळे शिवसेना फुटली: देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp