लोणावळा: लोणावळ्यात एका अल्पवयीन मुलीने (Crime News) सततचा मानसिक छळ आणि सार्वजनिक बदनामीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. यश ऊर्फ गजानन राऊत नावाचा युवक गेल्या काही काळापासून मुलीचा पाठलाग करत होता. तसेच तिचे नाव इतर मुलांशी जोडून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न करत होता. 8 मार्च रोजी या वादाने हिंसक वळण घेतले, जेव्हा आरोपींनी पीडितेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. या घटनेमुळे मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. समाजात तोंड कसे दाखवायचे, या चिंतेने अखेर 10 मार्च रोजी तिने आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणात यश राऊतसह, शुभम जगदीश राऊत आणि जगदीश महादेव राऊत या कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ‘पॉक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
जर तुमच्या आसपास कोणालाही अशा प्रकारे छळले जात असेल, तर शांत बसू नका. पोलिसांच्या ‘दामिनी पथका’शी संपर्क साधा. तुमची एक तक्रार एका निष्पाप मुलीचा जीव वाचवू शकते.







