Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सिक्युरिटी’ म्हणून ठेवलेली 5 लाखांची कार हडपली; थेऊर येथील तरुणाच्या विरोधात फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 21 March 2026, 11:07

लोणी काळभोर, ता. 21 : आईच्या उपचारासाठी उसने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात दिलेली 5 लाख रुपये किमतीची ‘मारुती स्विफ्ट’ कार मित्राने आणि त्याच्या ओळखीच्या व्यक्तीने संगनमत करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी थेऊर येथील एका तरुणावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नरेंद्र विनायक दाभाडे (वय-33, रा. ग्रीन पार्क, फुरसुंगी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हर्षल कुमावत, रा. थेऊर, ता. हवेली असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र दाभाडे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेंद्र दाभाडे हे एका नामांकित लॉजिस्टिक कंपनीत ‘सीनिअर स्पेशालिस्ट डेव्हलपर’ म्हणून कार्यरत आहेत. 5 मार्च 2026 रोजी त्यांच्या आईची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने 1 लाख रुपयांची गरज होती. त्यांनी आपला मित्र सौरभ गलांडे याच्याकडे मदत मागितली. सौरभने “माझ्याकडे पैसे नाहीत, पण माझा मित्र हर्षल कुमावत तुला पैसे देऊ शकतो,” असे सांगून त्यांना भेकराईनगर येथील एका बँकेसमोर भेटीसाठी बोलावले.

यावेळी हर्षल कुमावत याने पैसे देण्याची तयारी दर्शवली, मात्र ‘सिक्युरिटी’ म्हणून नरेंद्र यांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (MH 09 GM 6657) आणि आरसी बुक स्वतःकडे ठेवण्याची अट घातली. आईच्या उपचारासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने नरेंद्र यांनी आपली 5 लाख रुपये किमतीची लाल रंगाची कार हर्षलच्या ताब्यात दिली. हर्षलने सायंकाळपर्यंत 1 लाख रुपये ऑनलाईन पाठवतो, असे आश्वासन दिले होते.

त्याच दिवशी दुपारी नरेंद्र यांची इतर नातेवाईकांकडून पैशांची सोय झाली. त्यामुळे त्यांनी तात्काळ सौरभला फोन करून “आता मला हर्षलच्या पैशांची गरज नाही, माझी गाडी परत मागवून घे,” असे सांगितले. हर्षलने फोनवर “दुपारी 4 वाजेपर्यंत गाडी आणून देतो,” असे सांगितले, पण त्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. उद्या देतो अशी खोटी आश्वासने देऊन त्याने 13 दिवस उलटले तरी गाडी परत केली नाही.

दरम्यान, आपली गाडी परत मिळत नाही आणि हर्षल कुमावत केवळ तारखा देत आहे, हे लक्षात आल्यावर नरेंद्र दाभाडे यांनी आपली फसवणूक झाल्याचे ओळखून फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी 5 लाख रुपये किमतीची कार आणि आरसी बुक हडपल्याप्रकरणी हर्षल कुमावत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार हरिदास कदम करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

Shirur News: शिरूर तहसील कार्यालयात लाचखोरीचा सापळा; कंत्राटी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले, खाजगी इसम ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.