भिगवण: दौंड तालुक्यात 21 वर्षीय तरुणीच्या कथित अपहरणाने गेल्या २४ तासांत पुणे-सोलापूर महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता या प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. ज्या तरुणीसाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या, त्याच तरुणीने स्वतः समोर येत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यात तिने आपल्या अपहरणाचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

जहीर शेख आणि अयान शेख यांनी तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांना अडवले आणि डोळ्यात तिखट फेकून तरुणीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको केला आणि आज ‘भिगवण बंद’ची हाक दिली होती.
पाहा व्हिडीओ:
तणाव वाढत असतानाच संबंधित तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत तिने स्पष्ट केले की, तिचे आणि जहीर शेखचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने घरातून बाहेर पडले आहे,” असे तिने स्पष्टपणे सांगितले. अपहरणाच्या बातम्या राजकीय हेतूने पसरवल्या जात असल्याचे सांगत तिने अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.







