Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरड्यात अहिल्यादेवी जयंतीच्या उत्सवाला गालबोट! दोन गटात तुंबळ हाणामारी, 5 जखमी तर 7 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 5 June 2026, 12:43

लोणी काळभोर, ता. ५ : अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तरडे (ता. हवेली) येथील गवतेमळा परिसरात जुन्या वादातून दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत ५ जन जखमी झाले आहेत तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ७ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंपक उत्तमराव गवते (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समीर प्रभाकर दाभाडे (अंदाजे वय 26 ), प्रभाकर दत्तात्रय दाभाडे (अंदाजे वय 52 ) व अभिषेक प्रभाकर दाभाडे (अंदाजे वय 27 सर्व रा. गवतेमळा, तरडे ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अभिषेक प्रभाकर दाभाडे (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चंपक उत्तम गवते, आप्पा दिपक गवते, रूपक उत्तम गवते) व दिपक उत्तम गवते (सर्व रा.तरडे, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत फिर्यादी चंपक गवते (वय ४०) हे अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम आटोपून ३१ मे रोजी रात्री कुटुंबासह घरी परतत होते. तेव्हा समीर दाभाडे याने गवते अडवून धमकी दिली. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, काही वेळानंतर समीर दाभाडे, प्रभाकर दाभाडे आणि अभिषेक दाभाडे हे गवते यांच्या घरासमोर आले व शिवीगाळ करत वाद घातला.

समीर दाभाडे याने लोखंडी रॉडने चंपक गवते यांच्यावर हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या दिपक गवते, सिता गवते आणि इतर कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली. या धक्काबुक्कीत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रियंका दिपक गवते यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, अभिषेक दाभाडे व त्यांचा भाऊ समीर दाभाडे हा जयंतीनिमित्त झालेल्या जेवणाचा कार्यक्रम आटोपून मित्रांसह घरासमोरील बाकावर बसले होते. तेव्हा चंपक गवते व आप्पा गवते हे तेथे आले आणि त्यांनी विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यानंतर रूपक गवते आणि दिपक गवते हेही तेथे आले आणि समीरला मारहाण करण्यात सुरवात केली. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या अभिषेक दाभाडे यांच्यावर उत्तमराव गवते यांनी लोखंडी रॉडसदृश वस्तूने डोक्यात प्रहार केला.

दरम्यान, “तू आधीपासूनच माझ्या डोक्यात होतास, तुझा आज संतोष देशमुखच करतो,” अशी धमकी चंपक गवते यांनी दाभाडे यांना दिली आहे. यानंतर आरोपींनी दगड फेकून मारहाण केल्याने दाभाडे यांना दुखापत झाली आहे. घटनेनंतर दोन्ही गटांनी उपचार घेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, घटनेमागील नेमके कारण, हाणामारीची सुरुवात कोणी केली आणि प्रत्यक्षात काय घडले याचा तपास सुरू आहे.

जयंतीच्या उत्सवाला गालबोट
अहिल्यादेवी होळकर जयंतीसारख्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गावातच झालेल्या या हाणामारीमुळे तरडे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परस्परविरोधी तक्रारींमुळे सत्य काय, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली असून, पोलिसांच्या निष्पक्ष तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात ‘मेड इन पाकिस्तान’ चादरींची विक्री; भाविकांनी व्यक्त केला संताप

Friday, 5 June 2026, 14:06

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; महाराष्ट्र पोलिसांची मानवंदना

Friday, 5 June 2026, 13:45

कवडीपाट अपघात प्रकरण: डंपर चालकावर गुन्हा दाखल; आमदार-खासदार साहेब, अजून किती बळी गेल्यावर पुणे-सोलापूर महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष देणार?

Friday, 5 June 2026, 13:20

तरड्यात अहिल्यादेवी जयंतीच्या उत्सवाला गालबोट! दोन गटात तुंबळ हाणामारी, 5 जखमी तर 7 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Friday, 5 June 2026, 12:43

लोणी काळभोरचे उद्योजक हेमंत हाडके यांच्यावर गुन्हा दाखल; कदमवाकवस्तीतील अनधिकृत बांधकाम भोवले, पूर्व हवेलीतील शेकडो बांधकामांवर कारवाई होणार का?

Friday, 5 June 2026, 12:27

भारताने जुन्या काळात अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही पैसे वसूल करतोय- ट्रम्प

Friday, 5 June 2026, 12:13
Next Post

कवडीपाट अपघात प्रकरण: डंपर चालकावर गुन्हा दाखल; आमदार-खासदार साहेब, अजून किती बळी गेल्यावर पुणे-सोलापूर महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष देणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.