फुरसुंगी, ता. 17 : अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. 7 जानेवारी 2026 ला हि घटना घडली होती. याप्रकरणी पीडितेने 8 जानेवारी 2026 रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार विशेष पोलीस पथक स्थापन करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी आपले वास्तव्य सतत बदलत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीचा शोध घेवून गुन्हयात अटक करणे पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. आरोपीचा शोध घेत असाताना गोपनिय माहीती मिळाली की, तो धोम, ता. वाई, जि. सातारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने आरोपीधा माग काढून सापळा रचला व आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हा दाखल होताच तात्काळ गुन्हयाची उकल करण्यात फुरसुंगी पोलीसांना यश आले. त्यावरुन फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 13 /2026 भारतीय न्याय संहिता कलम 64(1), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 4. 8. 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अमोल मोरे, यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलीस हवालदार सागर वणवे, पोलीस अमलदार हेमंत कामथे यांनी केली आहे. पोलीस उप-निरीक्षक, रविंद्र डावरे हे करत आहेत.







