Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमआयटीच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली तब्बल 14 तास…! लाखो रुपयांची फी घेणाऱ्या नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा बोजवारा; आपत्कालीन यंत्रणा कुठे गेली?

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 November 2026, 19:52

लोणी काळभोर, ता. 19 : नामांकित शैक्षणिक संस्थेचा लौकिक मिरवणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविद्यालयातून घरी जात असताना 19 वर्षीय विद्यार्थिनी लिफ्टमध्ये तब्बल 14 तास अडकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 18) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लिफ्टमध्ये अडकलेली ही विद्यार्थिनी गुरुवारी (ता. 19) पहाटे सहाच्या सुमारास बाहेर आली. या काळात विद्यार्थिनीला ना अन्न, ना पाणी आणि ना बाहेर पडण्याचा मार्ग! दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याच्या भीतीने पालकांनी रात्रभर शोधाशोध केली. या घटनेने एमआयटी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली (ता. हवेली) येथील दोन मावस बहिणी लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात आयआयटीचे शिक्षण घेत आहेत.  बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यानंतर  संबंधित 19 वर्षीय विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे लिफ्टने खाली जात होती. यावेळी ती लिफ्टमध्ये एकटीच होती. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट अडकली.

अचानक लिफ्ट बंद पडल्याने घाबरलेल्या विद्यार्थिनीने दरवाजा ठोठावला, मोठमोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या लिफ्टमधील तिचा आवाज बाहेर पोहोचला नाही. तिने मोबाईलवरून आई-वडिलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन लागल्यानंतर केवळ ‘हॅलो’ एवढाच आवाज ऐकू आला आणि संपर्क तुटला. त्यानंतर पालकांनी वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिचा मोबाईलही बंद झाला.

पालकांची रात्रभर शोधाशोध; पोलिसांत धाव
मुलीशी संपर्क होत नसल्याने चिंताग्रस्त आई-वडिलांनी तातडीने लोणी काळभोर गाठले. संपूर्ण परिसरात, नातेवाइकांकडे आणि संभाव्य ठिकाणी शोध घेतला. मात्र, मुलगी कुठेच आढळून आली नाही. अखेर हतबल पालकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत मध्यरात्री उशिरा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तिचा शोध सुरू केला. मात्र, ती कुठेच सापडत नव्हती. प्रत्यक्षात ती याच शैक्षणिक संकुलातील लिफ्टमध्ये मृत्यूशी झुंज देत होती.

14 तासांनंतर सुटका; पालकांच्या जीवात जीव
अखेर गुरुवारी (ता.19) पहाटे सहाच्या सुमारास विद्युतपुरवठा पूर्ववत झाला. त्यानंतर एका महिलेने लिफ्टचे बटण दाबताच लिफ्ट सुरू झाली आणि तब्बल 14 तासांपासून आत अडकलेली विद्यार्थिनी सुखरूप बाहेर आली. मुलगी सुरक्षित असल्याचे समजताच चिंतेने व्याकूळ झालेल्या पालकांच्या जीवात जीव आला. मात्र, या घटनेमुळे विद्यार्थिनीला झालेला मानसिक त्रास आणि तिच्या कुटुंबीयांनी अनुभवलेली रात्रभराची घालमेल याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

लाखोंची फी, पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?
एमआयटीसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकून राहते, ही बाब केवळ धक्कादायक नाही, तर संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. लिफ्टमध्ये आपत्कालीन अलार्म, इंटरकॉम, बॅकअप वीजपुरवठा आणि आपत्कालीन बचाव यंत्रणा कार्यरत होती की नाही? विद्यार्थिनी लिफ्टमध्ये अडकल्यानंतर तब्बल 14 तास कोणालाही याची माहिती कशी मिळाली नाही? सुरक्षारक्षक आणि देखभाल विभाग नेमके काय करत होते? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी आकारणाऱ्या शैक्षणिक संस्थेला त्यांच्या मूलभूत सुरक्षेची जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर अशा व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. एमआयटी प्रशासन या गंभीर प्रकाराबाबत काय स्पष्टीकरण देणार आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सदर विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाला आणि प्राध्यापकांना समजल्यापासूनच विद्यापीठातील प्राध्यापक तसेच तिच्या वर्गाचे मेंटॉर हे सुरक्षा रक्षकांसह रात्रभर तिच्या पालकांच्या साथीने तिचा शोध घेत होते. तिचा शोध घेत असताना सर्वांनी ती सापडलेल्या इमारतीचीही रात्रीच तपासणी केली होती. मात्र, त्यावेळी ती तेथे आढळून आली नाही. दुर्दैवाने, पाच मिनिटांच्या वेळेत विद्युत पुरवठा तब्बल पाच ते सहा वेळा खंडित झाल्याने व त्यातून लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदर विद्यार्थिनी लिफ्टमध्ये अडकली. या दुर्दैवी घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने लिफ्ट कंपनीकडे या तांत्रिक बिघाडाबाबत विचारणा केली असून, लिफ्टमधील आपत्कालीन बचाव यंत्रणा (इमर्जन्सी रेस्क्यू सिस्टीम) त्यावेळी कार्यान्वित का झाली नाही, याबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. एकूणच, हा प्रकार लिफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे घडला असून, विद्यापीठ प्रशासनाने या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे.

एमआयटी विद्यापीठ प्रशासन

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59

एमआयटीच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली तब्बल 14 तास…! लाखो रुपयांची फी घेणाऱ्या नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा बोजवारा; आपत्कालीन यंत्रणा कुठे गेली?

Thursday, 19 November 2026, 19:52

मावळमध्ये तुकाराम मुंढेंच्या FDA चा मोठा दणका! थेट D-Mart च्या गोदामावर धाड टाकत जप्त केले तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल

Thursday, 19 November 2026, 19:37
Next Post

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? "आई हे लोकं मला आज मारून टाकतील" म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp