Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुपारी दिली मालकाची पण खून केला कामगाराचा! तपासातून आरोपींचा पर्दाफाश,रांजणगाव पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या!

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 6 October 2026, 14:40

शिरूर: जागेच्या वादातून एका व्यक्तीचा खून करण्यासाठी सुपारी देण्यात आली; मात्र नियोजित व्यक्तीऐवजी एका निष्पाप कामगाराचा गोळी झाडून खून झाला असल्याच्या गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमध्ये उघडकीस आणला आहे. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत रांजणगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून,आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीनुसार, हमजा उस्मान शेख (वय ३७, रा.कारेगाव, साईनगर, ता.शिरूर,जि.पुणे) हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते.यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळ तसेच परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान सार्थक संदेश कोहकडे (वय-२४, रा.कारेगाव, ता.शिरूर,जि.पुणे), तुषार अजय तोडकर (वय-२६, रा.पेठ, ता. आंबेगाव, जि.पुणे), संतोष मधुकर मांजरे (वय-३७, रा.मांजरेवस्ती, ता.खेड,जि.पुणे), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय-२७, रा.कोरेगाव, ता.खेड,जि.पुणे) आणि योगेश विलास इडोळे (वय-२८,रा. शुक्रवार पेठ वाशिम, ता.जि. वाशिम) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

जागेच्या वादातून खुनाची सुपारी

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सार्थक कोहकडे याचा विकास नवले याच्यासोबत जागेवरून वाद झाला होता. या वादातून विकास नवले यांचा खून करण्यासाठी कोहकडे याने तुषार तोडकर याला सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. तुषार तोडकर याने पुढे सराईत गुन्हेगार संतोष मांजरे याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मांजरे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने विकास नवले यांच्या खुनाचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले.

मात्र, खुनासाठी आखलेल्या कटात मोठी चूक झाली आणि प्रत्यक्ष विकास नवले याला समजण्यात झालेल्या गफलतीत कामगार हमजा शेख याचा गोळी झाडून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव या दोघांचा शोध सुरू आहे.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे या खुनाच्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलीस करीत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय मंजूर; वडार समाज, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; वाचा सविस्तर…

Tuesday, 6 October 2026, 15:23

नातवाच्या हत्येचा आजोबांनीच रचला ‘गेम’; शिवसेना नेत्याच्या मुलाच्या मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश

Tuesday, 6 October 2026, 15:13

‘तू कसा निवडून येतो ते बघतोच’ रोहित पवारांचं ओपन चॅलेंज; अजित पवार स्टाईलने सर्वांदेखत दिला इशारा

Tuesday, 6 October 2026, 14:49

सुपारी दिली मालकाची पण खून केला कामगाराचा! तपासातून आरोपींचा पर्दाफाश,रांजणगाव पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या!

Tuesday, 6 October 2026, 14:40

भयानक! नशेखोरांनी शाळेतल्या विद्यार्थ्याच्या मानेत ड्रग्सचं इंजेक्शन टोचलं; विद्यार्थी जागीच कोसळला, अंग तापलं अन्…

Tuesday, 6 October 2026, 14:25

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर युनिट-5च्या जाळ्यात

Tuesday, 6 October 2026, 14:14
Next Post

'तू कसा निवडून येतो ते बघतोच' रोहित पवारांचं ओपन चॅलेंज; अजित पवार स्टाईलने सर्वांदेखत दिला इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp