Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अर्ध्या गुंठ्याच्या जमिनीवरून रक्तरंजित संघर्ष? मंदार किवळे हल्ला प्रकरणात 8 जण पोलिसांच्या ताब्यात!

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 November 2026, 8:57

पुणे: शिवाजीनगर न्यायालय परिसरात मंदार किवळे याच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांनी प्रथमेश येनपुरे ऊर्फ येनप्ये यालाही अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील एकूण 9 आरोपींपैकी 8 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे.

25 नोव्हेंबर रोजी न्यायालय परिसरात हा हल्ला झाला होता. सहा जणांच्या टोळीने मंदारवर आधी गोळीबार केला. गोळी लक्ष्यावर न लागल्याने हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मंदारचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर  असल्याची माहिती समोर आली आहे.

कात्रजमधील जागेच्या वादातून हल्ला झाल्याचा संशय

या घटनेमागे कात्रजमधील संतोषनगर परिसरातील जमिनीचा वाद असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित भूखंडातील अर्ध्या गुंठ्याच्या मालकीवरून दोन गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे सांगितले जाते. याच वादातून 20 एप्रिल 2025 रोजी शुभम चव्हाण याची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणात मंदार किवळे याच्यासह काही जणांना अटक करण्यात आली होती.

शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने मंदारवर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. आरोपींना 2 डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अर्ध्या गुंठ्याच्या जमिनीवरून रक्तरंजित संघर्ष? मंदार किवळे हल्ला प्रकरणात 8 जण पोलिसांच्या ताब्यात!

Friday, 27 November 2026, 8:57

जातवैधता प्रमाणपत्र मिळवणं होणार सोपं! अर्जापासून सुनावणीपर्यंत सर्व काही ऑनलाइन; जाणून घ्या नवे नियम

Friday, 27 November 2026, 8:22

भारताचा लाजिरवाणा पराभव! 317 धावा करूनही श्रीलंकेसमोर टिकाव लागला नाही; तिलक वर्मा काय म्हणाला?

Friday, 27 November 2026, 8:15

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज कुठे पडणार पाऊस, कुठे जाणवणार थंडी? जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Friday, 27 November 2026, 7:39

Daily Horoscope: शुक्रवारी लक्ष्मी नारायण योगाचा शुभ प्रभाव! 5 राशींचे नशीब चमकणार; धनलाभासह मिळणार मोठी संधी

Friday, 27 November 2026, 7:30

पुणेकरांचे अंडरग्राउंड मेट्रो प्रवासाचे स्वप्न भंगणार? पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; ‘या’ मार्गिकेला स्पष्ट नकार!

Thursday, 26 November 2026, 22:12
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp