Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॅगमध्ये 5 लाख रुपये अन् रस्त्यातच पडली बॅग! पुण्यात व्यापाऱ्याची धावपळ, CCTV तपासलं अन् पोलिसांनी 48 तासांत लावला बॅगचा थांगपत्ता

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 19 September 2026, 9:58

पुणे: पुण्यात रस्त्यावर गहाळ झालेली लाखो रुपयांची रोकड आणि धनादेश असलेली बॅग पोलिसांनी अवघ्या 48 तासांत शोधून काढली. येवलेवाडी परिसरातील या घटनेत किराणा व्यापाऱ्याची बॅग दुचाकीवरून प्रवास करताना कुठेतरी पडली होती. बॅगमध्ये 2 लाख 54 हजार रुपयांची रोकड आणि सुमारे अडीच लाख रुपयांचा स्वाक्षरी केलेला धनादेश होता.

येवलेवाडीतील ‘बालाजी ट्रेडर्स’चे मालक 16 तारखेला दुकानासाठी आवश्यक असलेला माल खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांची बॅग रस्त्यात पडली. काही अंतर गेल्यानंतर बॅग जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलिसांकडे धाव घेतली.

व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने व्यापाऱ्याने प्रवास केलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

फुटेज तपासत असताना एका सोसायटीजवळ रस्त्यावर पडलेली बॅग एका पायी जाणाऱ्या व्यक्तीने उचलल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा माग काढला. संबंधित व्यक्ती बॅग घेऊन जवळच्या सोसायटीमध्ये गेल्याचे तपासातून समोर आले.

 

यानंतर पोलिसांनी सोसायटीमध्ये जाऊन संबंधित व्यक्तीकडून बॅग ताब्यात घेतली. बॅगमधील 2 लाख 54 हजार रुपयांची रोकड आणि स्वाक्षरी केलेला धनादेश सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर तो सर्व ऐवज व्यापाऱ्याच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे व्यापाऱ्याला मोठा दिलासा मिळाला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पूजा सुरू असताना अचानक काढली पिस्तूल! गोळ्या झाडून पत्नी- 2 पुजाऱ्यांची हत्या, 3 मुलांना घरात डांबले अन् 7 तासांचा थरार

Wednesday, 23 September 2026, 8:26

Maharashtra Weather: ढगांची गर्दी, विजांचा कडकडाट अन् पावसाच्या सरी! 23 सप्टेंबरचे महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Wednesday, 23 September 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार निर्णायक! 23 सप्टेंबरला कोणाला पैसा, संधी तर कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Wednesday, 23 September 2026, 7:48

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

Tuesday, 22 September 2026, 23:03

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Tuesday, 22 September 2026, 22:27

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

Tuesday, 22 September 2026, 22:07
Next Post

शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! माजी MPSC अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp