बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या (Baramati Election) घडामोडी घडल्या असून तब्बल 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. मात्र, एवढ्या (Abhijit Bichukle) मोठ्या प्रमाणात माघार घेऊनही निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा (Karuna Munde) यांनी आपले अर्ज कायम ठेवल्यामुळे ही लढत कायम राहणार आहे. (Maharashtra Politics)

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनेही माघार घेतली. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करून विनंती केल्याचे सांगितले. तसेच आमदार रोहित पवार यांनीही सकाळी भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही माघारीबाबत सूचना केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
बारामतीत एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 30 जणांनी अर्ज माघारी घेतल्याने आता 23 उमेदवार रिंगणात उरले आहेत. गुरुवारी 6 जणांनी अर्ज मागे घेतले होते, तर शेवटच्या दिवशी 24 उमेदवारांनी माघार घेतली.
दरम्यान, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी हे दोघेही बारामतीत उपस्थित नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता या दोघांच्या उपस्थितीत निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होणार आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होईल.
दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे बारामतीतील ही निवडणूक आता अधिकच लक्षवेधी ठरणार आहे.







