Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘तू मंद आहेस, तुला संसार जमत नाही’ म्हणत विवाहितेचा मानसिक छळ; जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 6 November 2025, 20:26
Pune Crime: Married woman mentally harassed by saying 'You are slow, you can't handle life'; Tired of the harassment, she took extreme step

Photo-Social Media

पुणे : कौटुंबिक कारणांवरून विवाहितेचा शारीरिक (Pune Crime) आणि मानसिक छळ करून (Pune News) तिला घटस्फोट देण्यासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पती, सासू, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव दिशा निलेश शहा (वय 25) असं आहे. या प्रकरणी तिची आई हीतश्री संदेश शहा (वय 57, रा. सोमजी हाईटस, श्रद्धानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती निलेश दिलीप शहा, सासू संगीता शहा, दीर प्रशांत शहा (तिघे रा. भुगाव) आणि नणंद ममता व्होरा (रा. नाशिक) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा हिचा विवाह 20 डिसेंबर 2024 रोजी निलेश शहा (वय 30, रा. माऊंट ब्लेअर सोसायटी, भुगाव) याच्यासोबत जैन समाजातील परंपरेनुसार झाला होता. निलेश शहा खासगी नोकरी करत होता. लग्नानंतर त्याने दिशाला नोकरी सोडायला भाग पाडलं. त्यानंतर तिचा सासरकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. तिला “तू स्लो आहेस”, “तुला संसार जमत नाही”, “तुझे डोळे छोटे आहेत” अशा शब्दांनी अपमानित केलं जात होतं. दिशा हिला स्वयंपाक करायला लावायचे, मात्र तिचं बनवलेलं अन्न कोणी खात नसे, असंही फिर्यादीने तक्रारीत म्हटलं आहे.

29 सप्टेंबर 2025 रोजी पती निलेश, सासू संगीता आणि नणंद ममता व्होरा हे दिशाला घेऊन तिच्या माहेरी आले. यावेळी ममता हिने फिर्यादींना “दिशाचं लग्न का केलं?” असं म्हटलं. त्यानंतर निलेश म्हणाला की, “तिला संसार जमणार नाही,” असं सांगून तिला माहेरी सोडून गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी निलेश आणि संगीता पुन्हा तिचे कपडे घेऊन आले आणि घटस्फोट घेण्याची तयारी असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी दिशासोबत वाद घालून तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र आणि कानातील दागिने जबरदस्तीने घेतले.

या घटनेनंतर दिशा मानसिक तणावात होती. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता तिच्या आई हितश्री शहा या एटीएममधून पैसे काढायला गेल्या असताना दिशाने हॉलमधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59
Next Post
Pune News: 'Bing broke out' in Pune Police Commissionerate itself! Impersonator 'IPS' officer who claimed to be DCP's batchmate arrested

Pune News: पुणे पोलीस आयुक्तालयातच 'बिंग फुटलं'! स्वतःला DCP चा बॅचमेट सांगणारा तोतया 'आयपीएस' अधिकारी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.