Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संपूर्ण राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! धमकीच्या ई-मेलमधील भीषण मजकुराने खळबळ; पोलीस यंत्रणा सतर्क

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 2 November 2026, 16:51

पुणे : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने न्यायालयीन परिसर रिकामा करून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथकांसह श्वान पथकांकडून तपासणी सुरू असून, सायबर पोलिसांकडून धमकीचे ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर आज सकाळी ९.४३ वाजता बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाला. दुपारी ३.११ वाजता स्फोट घडवण्याची धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आली होती. तसेच २७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ई-मेलमध्ये मेट्रो स्थानकांवर रात्री ९.११ वाजता स्फोट घडवण्याची तसेच १९८४ मधील रक्तपाताचा बदला घेण्याची भाषा करण्यात आली आहे. याशिवाय २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

धमकीचा संदेश मिळताच पोलिसांनी मानक कार्यपद्धतीनुसार दोन्ही न्यायालयीन इमारती रिकाम्या केल्या. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. इमारतीपासून सुमारे १०० मीटर परिसर मोकळा करण्यात आला. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून आठ मजल्यांच्या इमारतींसह पार्किंग, कँटीन आणि संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा आणि सायबर सेलही तपासात सहभागी झाले आहेत.

सांगली जिल्हा सत्र न्यायालयालाही बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. ई-मेलमध्ये दुपारी ३.११ वाजता न्यायालयाची इमारत उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने न्यायालय परिसराची तपासणी सुरू करण्यात आली.

सातारा न्यायालयालाही धमकी मिळाल्याची माहिती आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसर रिकामा केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात येत आहे.

परभणी जिल्हा न्यायालयाला धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. न्यायालय परिसरात बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वान पथक तसेच पोलिसांची विविध पथके दाखल झाली. संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पोर्टलवरील ई-मेल आयडीवर सकाळी ११ वाजता धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी न्यायालयात दाखल झाले. संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली असून सायबर पोलिसांकडून ई-मेलचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.

बीड जिल्हा सत्र न्यायालयालाही बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाला. खबरदारी म्हणून न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना बाहेर काढण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरू आहे.

राज्यातील विविध न्यायालयांना एकाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. संबंधित ई-मेल कोणी पाठवले, त्यामागे नेमका उद्देश काय आहे आणि धमकीमध्ये किती तथ्य आहे, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि न्यायालयीन परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रयत्नशील आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हिंजवडी-शिवाजीनगर प्रवास आता अवघ्या काही मिनिटांत! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पांचा उद्या होणार शुभारंभ

Monday, 2 November 2026, 17:41

नीरा येथे मध्यरात्री दुकानाच्या बॅनरला पेट्रोल टाकून आग; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Monday, 2 November 2026, 17:19

संपूर्ण राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! धमकीच्या ई-मेलमधील भीषण मजकुराने खळबळ; पोलीस यंत्रणा सतर्क

Monday, 2 November 2026, 16:51

फटाक्यांचा क्षणिक आनंद; निष्काळजीपणाने आयुष्यभराचा अंधार! डोळ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष नको, फटाक्यांची ठिणगी दृष्टी हिरावू शकते

Monday, 2 November 2026, 16:47

पुण्याचे शिवाजीनगर न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! ई-मेल प्राप्त होताच परिसरात प्रचंड खळबळ

Monday, 2 November 2026, 16:03

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, नग्न व्हिडीओ कॉल अन् ज्येष्ठ व्यक्तीसोबत घडलं भयंकर; ‘ती’ एक चूक करणं पडलं महागात…

Monday, 2 November 2026, 15:54
Next Post

नीरा येथे मध्यरात्री दुकानाच्या बॅनरला पेट्रोल टाकून आग; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp