Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ब्रिटनचा ‘तो’ पुण्यात करायचा धर्मपरिवर्तन! परदेशी धर्मगुरूचा पर्दाफाश; नव्या धर्मस्वातंत्र्य कायद्यांतर्गत पुण्यात पहिलीच मोठी कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 11 August 2026, 15:58

पुणे : पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी हे एक प्रकरण आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर खडक पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला. चर्चमध्ये झालेल्या प्रवचनादरम्यान नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या धार्मिक बाबी सांगण्यात आल्या, त्यातून धर्मपरिवर्तनासाठी प्रत्यक्ष प्रोत्साहन देण्यात आले का, तसेच भारतात वास्तव्यास असताना संबंधित परदेशी नागरिकाला धार्मिक कार्यक्रम घेण्याची कायदेशीर परवानगी होती का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मूळ महाराष्ट्रातील, नागरिकत्व ब्रिटनचे

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित धर्मगुरू मूळचा महाराष्ट्रातील आहे. मात्र, सध्या त्याच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असून तो भारतात कायमस्वरूपी राहत नाही. मागील काही दिवसांपासून तो पुण्यात वास्तव्यास होता. गुरुवार पेठेतील चर्चमध्ये त्याने यापूर्वीही काही प्रवचने आणि धार्मिक कार्यक्रम घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींना विशिष्ट प्रकारे प्रभावित करून धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खडक पोलिसांकडे धाव घेतली.

 

प्रवचनात नेमकं काय सांगितलं? पोलिसांकडून तपास

या प्रकरणात प्रवचनादरम्यान नेमके काय सांगण्यात आले होते, संबंधित व्यक्तीने धर्मपरिवर्तनासाठी कोणतेही प्रलोभन किंवा दबाव टाकला होता का आणि नव्या कायद्यातील कोणत्या तरतुदी या प्रकरणाला लागू होतात, याची पडताळणी पोलीस करत आहेत. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच या आरोपांमागील नेमके तथ्य स्पष्ट होणार आहे.

पुण्यात नव्या कायद्यांतर्गत दोन गुन्हे

दरम्यान, पुणे शहरात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमांतर्गत आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे. त्यानुसार पहिला गुन्हा ५ ऑगस्ट रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात, तर दुसरा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला.

फुरसुंगी येथील प्रकरणात एका तरुणीवर अत्याचार करून तिला धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01

स्वारगेटपासून आंबेगावपर्यंत खाकीचा महा-दणका! ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराईत तडीपार

Sunday, 13 September 2026, 19:46

अन् त्यानं दारूच्या पैशांसाठी चक्क दानपेटी फोडली! नशेची तलफ भागवायला देवाचे सोन्याचे डोळे चोरले; तरुणाचं विचित्र कृत्य

Sunday, 13 September 2026, 19:11

झटपट श्रीमंतीच्या नादात महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले; मैत्रिणीवर ठेवला आंधळा विश्वास अन् तिनेच दिला दगा….

Sunday, 13 September 2026, 18:25

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44
Next Post

एक चुकीचा निर्णय अन् संधी हुकणार! शिक्षक भरतीच्या नव्या नियमांमुळे उमेदवारांसमोर मोठे आव्हान; संस्थाचालकांची धाकधूक वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp