Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् त्यानं दारूच्या पैशांसाठी चक्क दानपेटी फोडली! नशेची तलफ भागवायला देवाचे सोन्याचे डोळे चोरले; तरुणाचं विचित्र कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 13 September 2026, 19:11

छत्रपती संभाजीनगर: नशेची तलफ भागवण्यासाठी पैसे कमी पडल्याने एका अल्पवयीन मुलाने थेट मंदिराला लक्ष्य करत चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थनगरातील श्रीराम मंदिर आणि मारुती मंदिराची दानपेटी फोडून त्याने रोख रक्कम चोरली. तसेच मारुतीच्या मूर्तीचे सोन्याचे दोन डोळे आणि शेजारील लहान मारुती मूर्तीचे चांदीचे दोन डोळेही चोरून नेले. क्रांतीचौक पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चार तासांत या विधीसंघर्षग्रस्त बालकाला रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

समर्थनगर येथील श्रीराम मंदिराचे पुजारी उदय विजयराव कुलकर्णी (४७) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. ९ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास मंदिर बंद करून ते घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरात आल्यानंतर मागील बाजूच्या चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी मारुती मंदिराचे पुजारी विवेक कुलकर्णी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माणिक रत्नपारखी, मयुरेश कोटणीस यांच्यासह विश्वस्तांना माहिती दिली.

पाहणी केली असता गेटचा कडीकोंडा तोडण्यात आल्याचे आणि लोखंडी सळईच्या साहाय्याने दानपेटी फोडल्याचे आढळले. दानपेटीतील रोख रक्कम घेण्यासोबतच मारुती मूर्तीचे सुमारे ३० हजार ५०० रुपये किमतीचे दोन सोन्याचे डोळे आणि लहान मारुती मूर्तीचे दोन चांदीचे डोळे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा शोध सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी चार तासांत रेल्वेस्थानक परिसरातून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

पोलिसांच्या तपासानुसार, हा मुलगा नशेच्या आहारी गेला असून, यापूर्वीही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. एसटी बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात चोरी करून मिळणाऱ्या पैशांतून तो नशा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. याच श्रीराम मंदिरात यापूर्वीही त्याने दानपेटी फोडून चोरी केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा मंदिरांना लक्ष्य केल्याचा पोलिसांचा दावा आहे. छावणी, समर्थनगर आणि जुन्या शहरातील इतर मंदिरांमध्येही त्याने चोरी केली आहे का, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक इंगोले, नेहा म्हस्के, अंमलदार संतोष मुदीराज, इरफान खान, माजीद पटेल, रविंद्र खरात, धम्मपाल लोखंडे आणि नंदू सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35

विवाहितेसोबत प्रेमसंबंध अन् नंतर थरारक शेवट! बारामतीत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Monday, 14 September 2026, 20:56

१० वर्षांची चिमुकली अन् ४ नराधम! चॉकलेटचं आमिष दाखवत केलं नको ते कृत्य नंतर चिमुकलीला धमकी देत….

Monday, 14 September 2026, 20:08
Next Post

स्वारगेटपासून आंबेगावपर्यंत खाकीचा महा-दणका! ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराईत तडीपार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp