Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलीस दलात खळबळ! अल्पवयीन मुलांची धिंड काढणं पडलं महागात; ५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह १७ पोलिसांवर गुन्हे दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 14:56

पुणे : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी आणि अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून १७ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुखापत करणे, बेकायदा कोंडून ठेवणे, फौजदारी बळाचा वापर, अपमान, धमकावणे तसेच लोकसेवकाने कायद्याचे उल्लंघन करून इजा पोहोचविणे यांसह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच बाल न्याय कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक अण्णा मधुकर दराडे, नीलेश राजेंद्र मोकाशी, गणेश मोहिते, हवालदार सुनील हनवते, अंमलदार सागर बोरगे, सोहम शेंडकर, राहुल औधकर, दिनेश टापके, मितेश चोरमोले, रवींद्र गायकवाड, मंगेश पवार, सागर बारगे, संदीप आगळे, सुवर्णा भिसे, फकीर आणि सुतार यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी सीआयडीचे उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दोन तक्रारी दिल्या आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना ५ जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर ७ जुलै रोजी या चौघांना लेक टाउनजवळील एसआरए कॉलनीतील पार्किंग परिसरात नेण्यात आले. तेथे त्यांना भररस्त्यात गुडघ्यावर चालण्यास सांगून लाठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

दुसऱ्या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना गाडीच्या बॉनेटवर बसवून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनांशी संबंधित काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली.

 

आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर, सदस्या न्यायमूर्ती स्वप्ना जोशी आणि सदस्य संजयकुमार यांच्या पूर्ण पीठाने चौकशी समिती नेमली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे आणि आयोगाचे निबंधक विजय केदार यांच्या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आल्याचे नमूद आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना संबंधित कॉलनीत नेल्याची जनरल डायरीमध्ये नोंद नसल्याचे आढळले. पोलिसांच्या वाहनाच्या लॉगबुकमध्येही या हालचालीची नोंद नसल्याचे तथ्यशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, मानवाधिकार आयोगासमोर जबाब देताना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आपण घटनास्थळी उपस्थित असल्याचे मान्य केले. व्हिडिओमध्ये दिसणारा अधिकारी वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील असल्याची ओळखही पोलिस कर्मचाऱ्यांनी करून दिल्याचे सीआयडीच्या एफआयआरमध्ये नमूद आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यात पुन्हा रक्तपात! तरुणावर कोयता आणि फायटरने जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Friday, 25 September 2026, 15:16

पुणे पोलीस दलात खळबळ! अल्पवयीन मुलांची धिंड काढणं पडलं महागात; ५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह १७ पोलिसांवर गुन्हे दाखल

Friday, 25 September 2026, 14:56

पुण्यात तोतया पोलिसाचा कारनामा! पोलिसांचं बनावट ओळखपत्र बनवलं; ‘मी पोलीस अधिकारी आहे’ असा धाक दाखवत फसवलं….

Friday, 25 September 2026, 14:25

अभिजित दीपके, सौरभ अन् रांक अडचणीत? FIR नंतर कोर्टात तातडीची सुनावणी; नेमकं काय घडलं?

Friday, 25 September 2026, 13:55

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

Friday, 25 September 2026, 13:16

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07
Next Post

शिरूर तालुक्यात पुन्हा रक्तपात! तरुणावर कोयता आणि फायटरने जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp