Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातला रीलस्टार राडा हॉटेल मालकाच्या अंगलट! रक्ताचे डाग पुसत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; मालकासह मॅनेजरला अटक…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 14:58

पुणे: पुण्यातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलमध्ये रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी सांडलेले रक्ताचे डाग धुऊन पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून हॉटेल मालक आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

हेमंत आनंद पाटील (वय ४२, रा. धायरी) आणि प्रेम पाटील (वय २३, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर हल्ल्याच्या घटनेनंतर महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

फ्लाईंग जिप्सी हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास अथर्व जगताप याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात डेक्कन पोलिसांनी माधवी कुंभारसह सात जणांना यापूर्वीच अटक केली आहे. हल्ल्यादरम्यान हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी किंवा तपास सुरू होण्याआधी हॉटेल मालक हेमंत पाटील आणि मॅनेजर प्रेम पाटील यांनी रक्ताचे डाग धुऊन टाकल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांना रात्री उशिरा अटक केली असून, त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनावरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरम्यान, फ्लाईंग जिप्सी हॉटेलच्या कारभाराबाबत यापूर्वीही तक्रारी आणि नियमभंगाचे आरोप झाल्याचे समोर आले आहे. बंगल्याच्या आवारात हॉटेल सुरू करणे, महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मध्यरात्रीनंतरही हॉटेल सुरू ठेवणे, अशा प्रकारांवरून संबंधित हॉटेल चर्चेत राहिले आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दाद न दिल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. रीलस्टारवरील हल्ला आणि त्यानंतर पुरावे नष्ट केल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यातील राहूत विजेच्या तीव्र धक्क्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा करुण अंत; आई सुदैवाने बचावली..

Wednesday, 19 August 2026, 15:05

पुण्यातला रीलस्टार राडा हॉटेल मालकाच्या अंगलट! रक्ताचे डाग पुसत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; मालकासह मॅनेजरला अटक…

Wednesday, 19 August 2026, 14:58

नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात! ५ वाहनं एकमेकांवर आदळली; रिक्षाचा चक्काचूर

Wednesday, 19 August 2026, 14:36

एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचं आमिष! 39 जणांनी 20 कोटी 34 लाख दिले अन् अचानक भिशीच बंद; शिरूरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा

Wednesday, 19 August 2026, 14:33

मुंबईच्या महापौरांवर प्रसिद्धीच्या खर्चाचा आरोप! वारेमाप उधळपट्टीमुळे राजकारण तापलं, विरोधक आक्रमक

Wednesday, 19 August 2026, 14:09

‘तुला पेरू देतो’ म्हणत शेतात नेलं, जबर मारहाण केली अन् तिच्या शरीराचे लचके तोडून केली हत्या; जुन्नर येथील घटनेची A to Z माहिती आली समोर

Wednesday, 19 August 2026, 13:40
Next Post

दौंड तालुक्यातील राहूत विजेच्या तीव्र धक्क्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा करुण अंत; आई सुदैवाने बचावली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.