Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथील आंबेडकर चौकात मध्यरात्री गोंधळ! 9 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाद मिटला

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 April 2026, 11:51

Pune News : दौंड, ता. 15 : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. 14) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. साऊंड सिस्टमवरून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणातच दोन गटांतील उग्र भांडणात परिवर्तित झाला. झोंबाझोंबी, ढकलाढकली आणि आरडाओरड यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे.

 

शुभम प्रदीप गव्हाणे, प्रशांत भास्कर सोनवणे, सिंध्दांत अनिल सोनवणे, राहुल शिवाजी शेंडगे, आशिष दिलीप गायकवाड, बुद्धभूषण अनिल सरोदे, अनिकेत गौतम मिसाळ, सागर गायकवाड व हिमांशू गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बबन जयवंत जाधव (वय 54) यांनी सरकारच्या वतीने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक बबन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांवर 13 एप्रिल रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 14 एप्रिल सकाळी 9 वाजेपर्यंत रात्रगस्त कर्तव्य सोपवण्यात आले होते. पहाटे सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तैनात असलेल्या पोलिसांकडून गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात होते. त्याचवेळी काही युवक चौकात जमले होते. साऊंड वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पोलिसांचे आदेश धुडकावून लावत एकमेकांवर झडप घातली. काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली.

दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलीस पथक दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक, फौजदार, पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्ड यांनी मिळून संबंधितांची झोंबाझोंबी सोडवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला तात्काळ पांगवण्यात आले. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. शहरातील संवेदनशील भागात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

या प्रकरणी आरोपींच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 194(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत असून, आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Politics

Politics : ‘कैसे हराया’ विचारणाऱ्या सहर शेखचा गेम ओव्हर? नगरसेविका पद जाणार, एका चुकीमुळे वडिलांनाही भोगावे लागणार तुरुंगवास!

Wednesday, 15 April 2026, 12:52

पांढरकवडा-घाटंजी मार्गावर भीषण अपघात; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Wednesday, 15 April 2026, 12:41

Lonikand News: हवेलीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 22 लाखांची फसवणूक, हप्ते भरण्याच्या बहाण्याने तीन गाड्या परस्पर विकल्या; गुन्हा दाखल

Wednesday, 15 April 2026, 12:15

पुणे विमानतळाचा कायापालट! एकाच वेळी अनेक नवीन फ्लाइट्सना परवानगी; आता प्रवास होणार अधिक सुखकर

Wednesday, 15 April 2026, 12:13

राज्य सरकारकडून ‘या’ वेळेत सक्तीची ‘कामबंदी’ लागू, 15 जिल्ह्यांना हाय-अलर्ट

Wednesday, 15 April 2026, 12:09

दौंड येथील आंबेडकर चौकात मध्यरात्री गोंधळ! 9 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाद मिटला

Wednesday, 15 April 2026, 11:51
Next Post

राज्य सरकारकडून 'या' वेळेत सक्तीची 'कामबंदी' लागू, 15 जिल्ह्यांना हाय-अलर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.