Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: भवरापूर येथे जमिनीच्या जुन्या वादातून भरदिवसा कारची धडक देत चुलत भावाचा खून; उरुळी कांचन पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 3 March 2026, 11:15

Pune News: उरुळी कांचन, (पुणे) : शेतीच्या जुन्या वादातून तसेच नदीवरील सामाईक मोटार दुरूस्तीचे कारणावरून भरदिवसा कारने मोटारसायकलला जोरदार धडक देत सख्ख्या चुलत भावाचा चुलत भावाने खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली. उरुळी कांचन-भवरापूर मार्गावरील साठे वस्ती परिसरात सोमवारी (ता. 02) दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.

 

महेश लक्ष्मण साठे (वय-32, व्यवसाय शेती, रा. भवरापूर, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अक्षय दशरथ साठे (वय 32, रा. भवरापूर ता. हवेली), व गोकुळ नाना कोकरे (वय 23, रा. आष्टापूर ता. हवेली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मयत महेशचे वडील लक्ष्मण सोपान साठे (वय 58, रा. भवरापूर, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवरापूर येथील जमीन गट क्रमांक 104 संदर्भातील जुना वाद तसेच सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून सोमवरी दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास महेश साठे हे झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी पोलीसांनी महेश साठे ला वैद्यकीय तपासणी उरुळी कांचन येथे तपासणीसाठी पाठवले होते.

मयत महेश साठे हे आपल्या हिरो होंडा पॅशन (MH12CJ9551) मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी त्यांच्या हुंदाई आय-20(MH12QY7888) कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक जाणीवपूर्वक देऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 279, 337, 338 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत. घटनेमुळे भवरापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत महेश साठे यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, व चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59
Next Post

Pune Crime : पीएमीपीच्या तिकीटात मोठी हेराफेरी! बनावट ॲपद्वारे तरुणाचा प्रताप, कंडक्टरच्या हुशारीने रॅकेट उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.