Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिकेत राडा! उपमहापौर कार्यालयातच कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; खुर्च्या फेकल्या अन् शर्टही फाडला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 March 2026, 16:14

Pune News: पुणे : पुणे महापालिकेच्या उपमहापौर कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील पुतळ्यापाशी महापालिकेकडून एकच मोठा मंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रशासनाने तेथील छोटे स्वागत मंडप आणि बॅनर हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. याच कारवाईदरम्यान ताडीवाला रस्ता परिसरातील एक लहान मंडप काढण्यात आल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

 

याप्रकरणी तक्रार करण्यासाठी काही कार्यकर्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या दालनात गेले होते. त्यावेळी तिथे आधीच काही इतर कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेदरम्यान जयदेव रंधवे नावाच्या व्यक्तीने तक्रार घेऊन आलेल्यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. या साध्या वादाचे रूपांतर पाहता पाहता मोठ्या हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांवर खुर्च्या उचलून धावून गेले आणि एका कार्यकर्त्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे उपमहापौर कार्यालयाला जणू युद्धभूमीचे स्वरूप आले होते.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेतली. मारहाण झालेल्या तरुणाने आपल्या इतर सहकाऱ्यांनाही महापालिकेत बोलावून घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. संबंधित हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, केवळ मंडप काढल्याच्या कारणावरून ही वादावादी झाली असून त्यामागे कार्यकर्त्यांचे जुने वादही कारणीभूत असू शकतात. रात्री उशिरापर्यंत या वादावर पडदा टाकण्यासाठी उपमहापौर कार्यालयात बैठकांचे सत्र सुरू होते.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post

यवत पोलिसांचा गावठी हातभट्टीवर धाडसी छापा! 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; विषारी रसायन जागीच केलं नष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.