Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिकेची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखालीच; पक्षश्रेष्ठींच्या स्पष्ट सूचना

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 10 August 2025, 17:23

संतोष मुंडे

 

पुणे: राज्यात येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर रणशिंग फुंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय गणित अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

महाविकास आघाडीतील स्थानिक नेते एकत्रितपणे निवडणूक लढवावी, यावर आग्रही असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये मात्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा भाजपचे स्थानिक नेते करत आहेत. मात्र, महायुतीतीलच इतर घटक पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व असलेली शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवावी, असा सूर लावला आहे.

याच पार्श्वभूमीवर शनिवारी कोथरूड येथे झालेल्या शिवसेना सदस्य नोंदणी व आरोग्य शिबिर कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. “महानगरपालिका निवडणुका महायुतीच्या वतीनेच लढवल्या जाणार असल्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींकडून प्राप्त झाल्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “कोथरूड आणि शिवाजीनगर हे मतदारसंघ महायुतीचे बालेकिल्ले राहिले आहेत. येथे शिवसैनिकांनी सातत्याने प्रामाणिकपणे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील लढत महायुतीच्या झेंड्याखालीच पार पडेल.”

आरोग्य शिबिरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. “या उपक्रमामधून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांचे लवकर निदान होऊन उपचार शक्य होतात. महायुती सरकार नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे,” असे सांगत गोऱ्हे यांनी आगामी निवडणुकीसाठी जनतेचा आशीर्वाद मागितला.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोणता गठबंधनाचा फॉर्म्युला अंतिम होतो, याकडे आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व स्मारकासाठी लढा तीव्र; नसरापूरमध्ये भीमसैनिकांची बैठक व आदर्श सरपंच नवनाथ कदमांचा सत्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.