Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील प्रकार! “तु तिच्याशी का बोलला?” मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद; पंटर मित्र जमवून तरुणाला बेदम मारहाण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 February 2026, 16:46

पुणे: पौड फाटा परिसरात मध्यरात्री घडलेल्या मारहाणीच्या (Pune Crime) घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. “माझ्या मैत्रिणीशी का बोलतो?” या कारणावरून टोळक्याने एका 21 वर्षीय तरुणावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास मेगासिटी रोडवर घडली.

 

या प्रकरणी 21 वर्षीय तरुणाने कोथरूड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वाकडेवाडी येथे नोकरी करतात. काही दिवसांपूर्वी पत्रकारनगर परिसरात आरोपींपैकी एकाने “तू माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस?” असा जाब विचारत वाद घातला होता. त्या वेळी ओळखीचे असल्याने तक्रार देण्यात आली नव्हती.

मात्र 24 फेब्रुवारीच्या रात्री फिर्यादी आपल्या मित्रासोबत रस्त्यावर उभे असताना तिन्ही गाड्यांवरून आरोपी तेथे आले. बोलण्याच्या बहाण्याने बाजूला येण्यास सांगितले. फिर्यादी न गेल्याने शिवीगाळ सुरू झाली आणि लगेचच मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर एका आरोपीने धारदार हत्याराने वार केल्याचा आरोप आहे. स्वतःचा बचाव करताना फिर्यादीच्या हाताला आणि नंतर डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली.

जखमी अवस्थेत फिर्यादीने ससून हॉस्पिटल येथे उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post

Maria IPS John Abraham: सात वर्षांपासून हिटच्या प्रतीक्षेत जॉन अब्राहम; ‘मारिया आयपीएस’मधून दमदार पुनरागमन?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.