Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत 34 लाखांचा अपहार करणारा ‘मॅनेजर’ 6 महिन्यांनंतर गजाआड; शहर पोलिसांची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 26 March 2026, 11:07

Pune Crime : बारामती, ता. 26 : हॉटेल व्यवसायात व्यवस्थापक म्हणून काम करताना मालकाचा विश्वासघात करून 34 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या आणि मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय खुळे हा एका नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. या काळात त्याने ग्राहकांची बनावट नावे नोंदवणे, उधारीचे खोटे हिशोब दाखवणे आणि आर्थिक व्यवहारात फेरफार करणे अशा प्रकारांचा अवलंब केला. या माध्यमातून त्याने एकूण 34 लाख 33 हजार 393 रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सतत आपला ठावठिकाणा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यानुसार आरोपी खुळे हा माळेगाव परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत, सहायक फौजदार संदीप जाधव, हवालदार रामचंद्र शिंदे आणि पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांनी केली.

“गुन्हेगार कितीही चतुर असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही,” असा संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. अपहार झालेली रक्कम हस्तगत करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीत सखोल चौकशी सुरू आहे. तसेच अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहून तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीशैल चिवडशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस ठाणे

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? इराण युद्ध आलं अंगलट; व्हाईट हाऊसमध्ये मोठी उलथापालथ!

Sunday, 5 April 2026, 10:02

बँकॉकहून पुण्यात आला अन् विमानतळावरच फसला! 33 लाखांच्या हायड्रोपोनिक गांजासह तस्कर गजाआड

Sunday, 5 April 2026, 9:50

Pune News: आईने कूस बदलली अन् 8 वर्षीय मैराबीचा रक्ताने माखलेला दिसला मृतदेह; शेजारीच झोपलेल्या चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:38

धुरंधर बनायच्या नादात होत्याचं नव्हतं झालं! धुरंधर 2 चा शो संपला अन् अचानक तलवारीने सपासप वार; गँगवारमध्ये तिघांची निर्घृण हत्या; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:10

Pune News: पांढरे केस अन् चेहऱ्यावर शांतता! 68 वर्षीय आजोबांच्या खिशात हात घालताच पोलिसांना फुटला घाम! पाहा काय होतं त्या पिशवीत? वाचा

Sunday, 5 April 2026, 8:47

यवत चकाकले! अखेर 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 160 पथदिव्यांनी उजळला पुणे-सोलापूर महामार्ग; ‘पुणे प्राईम न्यूज’चा इम्पॅक्ट

Sunday, 5 April 2026, 8:25
Next Post
Pune

Pune : पुण्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.