Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘हत्ये’साठी सासरचे तुरुंगात, मेलेली सून पुण्यात जिवंत? समोर पाहताच सर्वांचे डोळेचं फिरले, नेमकं काय प्रकरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 January 2026, 14:56

Pune Crime: पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ज्या सुनेला सासरच्या जाचाने कंटाळून जीव गमवावा लागला असा समज करून, तिच्या सासरच्या मंडळींवर हुंडाबळीचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता, तीच महिला चक्क पाच महिन्यांनंतर पुण्यात धडधाकट अवस्थेत फिरताना सापडली. एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमात शोभावं असं हे प्रकरण असून, या एका चुकीच्या आरोपाने एका कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा तर धुळीला मिळालीच, पण पोलीस तपासावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ज्या महिलेच्या हत्येचा तपास पोलीस करत होते, ती जिवंत सापडल्याने आता पोलीस प्रशासनाची मोठी खळबळ माजली. Crime News

 

हेही वाचा– टीम इंडियाला मोठा धक्का! वॉशिंग्टन सुंदर मालिकेतून बाहेर; टी-२० वर्ल्डकपचं स्वप्न अधुरं राहणार? पहा कोण घेणार जागा!

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील लक्ष्मणपूर गंगापूर येथील रहिवासी असलेल्या दीपा हिचा विवाह ओरीपुरवा येथील हंसराज याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच दीपा अचानक बेपत्ता झाली. ऑगस्ट 2025 पासून तिचा कोणताही पत्ता लागत नव्हता. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.

दीपा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. हुंड्यासाठी दीपाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दीपाच्या आई-वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर दीपाचा पती हंसराज, सासरे परमेश्वर आणि सासू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान अधिकारी सतीश शर्मा यांनी दीपाच्या मोबाईलचा तांत्रिक डेटा तपासला. यामध्ये तिचे लोकेशन पुणे शहरात असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यात शोध घेऊन दीपाला ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत दीपाने धक्कादायक खुलासा केला. कोणाच्याही दबावाखाली न येता आपण स्वतःच्या मर्जीने घर सोडून पुण्यात आलो असल्याचे तिने सांगितले. सध्या पोलिसांनी दीपाला श्रावस्तीत नेले असून तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिच्या जबाबानंतर सासरच्या मंडळींवरील हत्येचे कलम काढले जाणार की पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल, हे स्पष्ट होणार आहे. एका जिवंत व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Next Post

दिवसातून किती वेळा जेवण करावे? 3 वेळा की जास्त? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.