Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: बापरे! पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद; 40 जणांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 January 2026, 9:40

Pune News: पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात एक भीषण घटना घडली. चाकण येथील आंबेठाण रस्त्यावर एक पिसाळलेला कुत्रा अचानक नागरिकांवर हल्ले करत सुटल्याने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. हा कुत्रा जो दिसेल त्याच्यावर झडप घालत होता. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक इतकेच नाही तर रस्त्यावरील इतर प्राण्यांनाही त्याने चावा घ्यायला सुरुवात केली होती. काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि लोकांमध्ये भीती पसरली.

 

भाजी आणायला गेलेली महिला, रस्त्याने चालणारे वृद्ध, तसेच लहान मुले या कुत्र्याच्या हल्ल्याचे बळी ठरले. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. हा पिसाळलेला कुत्रा पुढे महात्मा फुले चौक, श्री शिवाजी विद्यामंदिर आणि मार्केट यार्ड परिसरात पोहोचला. त्याने इतर भटक्या कुत्र्यांनाही चावा घेतला, त्यामुळे संकट आणखी वाढले.

पालिकेकडून वेळेत उपाययोजना न झाल्याने संतप्त नागरिकांनी अखेर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कुत्र्याला ठार मारले. मात्र संकट तिथेच थांबले नाही. ज्या कुत्र्यांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता, ते कुत्रेही हल्ले करत सुटले. या हल्ल्यांमध्ये चाकण परिसरातील सुमारे 40 नागरिक जखमी झाले, तर इतर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 जणांना चावा बसला.

जखमी नागरिक उपचारासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. मात्र तेथे रेबीजची लस उपलब्ध नसल्याचे समोर आले. रक्ताने माखलेले कपडे, वेदनेने विव्हळणारी लहान मुले आणि घाबरलेले वृद्ध यांना घेऊन नातेवाइकांना पुण्यातील ससून रुग्णालय किंवा पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात धाव घ्यावी लागली. सायंकाळी उशिरा चाकण ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध झाली, मात्र तोपर्यंत नागरिकांचा संताप अनावर झाला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना भीतीच्या वातावरणात जगावे लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

घर खरेदीदारांची डोकेदुखी थांबणार! 'मोफा' कायद्यात सुधारणा; वाचा सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.