Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 April 2026, 14:33
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुणे: येरवडा परिसरातील फुलेनगर येथे आईला मारहाण करत (Pune Crime) असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र समजावण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित मुलानेच पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

 

श्रेयश संजय कोराड (वय 30, रा. फुलेनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराने फिर्याद दिली आहे. ही घटना 6 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7.45 वाजण्याच्या सुमारास वि. द. घाटे शाळेजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाकडून अंकुश काची यांना माहिती मिळाली की, एक युवक आपल्या आईला शिवीगाळ करत असून तिला जीवे मारण्याची धमकी देत आहे. तसेच तो मोठ्याने आरडा-ओरडा करत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी श्रेयश कोराड याला शांत करण्याचा आणि त्याला आई उज्वला कोराड (वय 55) यांना मारहाण करू नये, असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मद्याच्या नशेत असल्याने त्याने पोलिसांचे ऐकले नाही. उलट त्याने आक्रमक होत पोलीस अंमलदारांची कॉलर पकडली आणि त्यांना खाली पाडले.

यानंतर आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत त्याने पोलिसांच्या गणवेशाची बटणे देखील तोडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच मदतीसाठी इतर पोलिसांना बोलावण्यात आले.

मदतीला आलेल्या पोलीस अंमलदार धुगे यांनाही आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच तपास पथकातील पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनाही त्याने धमक्या दिल्या. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत श्रेयश कोराड याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि धमकी देणे या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. कौटुंबिक वादातून सुरू झालेल्या या प्रकाराने गंभीर वळण घेतल्याचे समोर आले आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Next Post

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.