Tuesday, June 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे विद्यापीठात 11 जूनला मोठा राडा? शिक्षण मंत्र्यांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची आंदोलनाची हाक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 8 June 2026, 22:19

पुणे: नीट आणि सीबीएसई परीक्षांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर आता पक्षाने महाराष्ट्रातही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून पुढील आंदोलन पुण्यात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी याबाबत माहिती देताना, देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी विविध शहरांमध्ये आंदोलनांची मालिका राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पुण्यात 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

 

दिल्लीतील जंतरमंतर येथे पक्षाने पहिले आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. अभिजीत दीपके हे अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर थेट आंदोलनस्थळी पोहोचल्याचेही सांगण्यात आले.

पुण्यातील आंदोलनातूनही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असल्याने राज्यातील त्यांच्या पहिल्या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागले आहे. दिल्लीतील आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. आंदोलनाच्या उपस्थितीबाबत काहींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले होते.

दरम्यान, पुण्यात होणाऱ्या आंदोलनासाठी पोलिसांची अधिकृत परवानगी मिळाली आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्यातून कोणता संदेश जातो, याकडे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिक्रापूर पोलीस ठाण्याला मिळाले नवे नेतृत्व; दीपरत्न गायकवाड यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी

Monday, 8 June 2026, 23:01

पुणे विद्यापीठात 11 जूनला मोठा राडा? शिक्षण मंत्र्यांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची आंदोलनाची हाक

Monday, 8 June 2026, 22:19

पुण्यात अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघड! खराडीत 13 किलो अफूचा चुरा जप्त; राजस्थानच्या तस्कराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Monday, 8 June 2026, 21:39

पुण्यात दिवाणी दाव्याच्या रागातून भावानेच पेटवलं भावाचं घर; खिडकी तोडून जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला

Monday, 8 June 2026, 21:01

पुण्यात तलाठी आणि खासगी एजंटला रंगेहाथ अटक! ‘काम करायचं तर पैसे द्यावे लागतील’ म्हणत मागितली 70 हजारांची लाच

Monday, 8 June 2026, 20:39

“पोलीस कुणाच्या चावीवर चालतात?” तुळापूर पार्टीप्रकरणी रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल; गृहमंत्र्यांकडे मागितला खुलासा

Monday, 8 June 2026, 20:24
Next Post

शिक्रापूर पोलीस ठाण्याला मिळाले नवे नेतृत्व; दीपरत्न गायकवाड यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.