PMPML bus catches fire : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी PMPMLच्या दोन बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र, या घटनेनंतर PMPML च्या बस सुरक्षित आहेत की नाही, हा प्रश्न विचारला जातोय.

पहिली घटना
सकाळच्या वेळी पिंपरीतमध्ये अचानक बस पेटली, तेव्हा बसमध्ये जवळपास १५ प्रवासी होते. बस चालकाला इंजिनमधून धूर येताना दिसताचं, बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली. सर्व प्रवाशांना पटपट बाहेर उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. त्यानंतर अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दल दाखल झाल्याने आग आटोक्यात आली, आणि मोठी हानी टळली. पण PMPMLच्या बसचे मोठे नुकसान झाले. (PMPML bus catches fire) प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दुसरी घटना सायंकाळी काळेवाडी परिसरात घडली
तर दुसरी घटना सायंकाळी काळेवाडी परिसरात घडली. शिवाजीनगरहून निगडीकडे जात असताना बस अचानक पेटली. या ठिकाणीही सुदैवाने कोणताही जीवितहानीचा प्रसंग घडला नाही. एकाच दिवशी दोन बस पेटल्याने नागरिकांनी PMPML च्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बसची नियमित तपासणी, तांत्रिक बिघाडावर वेळेवर लक्ष आणि अग्निसुरक्षा हा मोठा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दोन्ही घटनांमध्ये चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुरक्षित बाहेर पडले. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.







