Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्र्यांचा पिंपरी-चिंचवड पालिकेला दणका; दिले ‘हे’ आदेश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 11:17
Physical test for PCMC fireman recruitment to hold in january

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाकड येथील वादग्रस्त ठरलेल्या टीडीआर प्रकरणात महत्वाचे आदेश दिले आहेत. समावेशक आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गत विकसित करण्यासाठी देण्यात आलेल्या मंजुरीला व त्यानुसार दिलेल्या सुविधा टीडीआर वापरास स्थगितीचा प्रस्ताव सादर करा असे आदेश नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. या आदेशामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अधिकाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या टीडीआर घोटाळया सबंधित चर्चा झाली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण देत योग्य पद्धतीने प्रक्रिया झाल्याचा दावा करत प्रकरण रेटून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजप आमदार राम सातपुते यांनी याबाबत एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे स्थगितीची मागणी केली होती. त्या पत्रानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास खात्याला याबाबत स्थगितीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सुविधा टीडीआर वापरावर तत्काळ स्थगिती द्या : सातपुते

भाजप आमदार राम सातपुते यांनी पत्रात म्हटले आहे की, वाकड येथील स.न.१२२ येथील विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४ /३८ ट्रक टर्मिनस (काही भाग) व ४/३८A पीएमपी डेपो या आरक्षणासाठी १०,२७४ चौरस मीटर क्षेत्र समावेशक आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गत विकसित करण्याची परवानगी बेकायदेशीरपणे देण्यात आली आहे.

 

या प्रकरणात मंजुरी देताना विकसकाला मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा, यासाठी अनेक नियम, अटी, तरतुदी, कार्यपध्दतीचा विपर्यास केला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि मोबदला स्वरुपात देण्यात आलेला सुविधा टीडीआर वापरावर तत्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणीही सातपुते यांनी केली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.