Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एक दिवा जिजाऊंसाठी, एक दिवा छत्रपती शिवरायांसाठी… दीपोत्सवातून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 13:58

पिंपरी : छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी खिंवसरा-पाटील शैक्षणिक संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा संगीत नाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण करीत दीपोत्सव साजरा केला. या वेळी “एक दिवा जिजाऊ मातेसाठी…” , “एक दिवा छत्रपती शिवरायांसाठी…” , “एक दिवा हिंदवी स्वराज्यासाठी…” , “एक दिवा भगवतगीतेतील विश्वरुप दर्शनासाठी…” असा जयघोष करीत सोहळ्यात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. मीनल दर्शले, ॲड. अय्याज शेख, ॲड. मंगेश खराबे, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. विवेक राऊत, ज्ञानदीप एज्युकेशनलचे संचालक दत्तात्रय यादव, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष राहुल आहेर, आत्मजा फाउंडेशनच्या समन्वयक प्रिया गुरव, वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्या विदुला पेंडसे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, संचालक सदस्य आसाराम कसबे, शालासमिती अध्यक्ष नितीन बारणे इत्यादी मान्यवर तसेच मुख्याध्यापक नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, आशा हुले, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी याचबरोबर बहुसंख्येने पालकवर्ग, विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

शिवराज्याभिषेक सोहळा नाट्यात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा, अफजलखान वध, राज्याभिषेक करण्यामागील कारणे, राज्याभिषेकाची जय्यत तयारी, प्रत्यक्ष गागाभट्टांनी शिवरायांवर केलेला राज्याभिषेक सोहळा, यज्ञ, होमहवन, शिवरायांना सिंहासनावर विराजमान होताना स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांचे झालेले स्मरण अशा विविध प्रसंगांबरोबरच कथानकाला साजेसे नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. या वेळी शाहीर आसराम कसबे यांच्या विश्वरूप दर्शन घडविणार्‍या भगवतगीतेच्या ११व्या अध्यायाच्या केलेल्या गीतलेखनाच्या ध्वनी चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

 

पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन केले. यावे ळी इयत्ता आठवीतील आकांक्षा रोडे आणि पंकज काळे यांनी रायगड किल्ल्याची माहिती सांगितली. प्रा. दिगंबर ढोकले यांनी प्रदूषण वाढविणारे फटाके वाजवू नका, असे आवाहन केले. किल्ला बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले.

पालकांनी बनवलेल्या झेंडू फुलांच्या माळांची सजावट, रेखाटलेली सुरेख रांगोळी, रायगड किल्ल्याची प्रतिकृती, विद्यार्थ्यांनी बनवलेले कागदी आकाशकंदील, रंगवलेल्या पणत्यांनी उजळलेले आसमंत, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे त्रिमितीय फलकलेखन, दिवाळी शुभेच्छा देणारे फलकलेखन, पारंपरिक वेशभूषेतील पालकांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाच्या आनंदाने एक उंची गाठलेली.

त्या आनंदाला शिखरावर नेले ते शिवराज्याभिषेक सोहळ्यातील विद्यार्थ्यांची हुबेहुब केलेली वेशभूषा, अभिनय, त्यांचा छत्रचामरासहित तुतारीच्या निनादात शिवरायांचे रंगमंचावरील आगमन, प्रत्यक्ष होमकुंड प्रज्वलित करून झालेला राज्याभिषेक विधी, शिवपिंड प्रतिकृतीला साक्ष मानून केलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, अफजल खान वधाचा थरार, लक्षवेधक नृत्य आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रसंग किल्ले रायगडाने आत्मवृत्त निवेदनातून उलगडत नेल्याने सर्व प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले गेले.

शेवटी उस्फूर्तपणे झालेल्या शिवगर्जनेने आणि जयजयकाराने सारा परिसर निनादून गेला. विश्वरूप दर्शन घडविणार्‍या भगवद्गीतेतील ११ व्या अध्यायातील गीतरचनेचा काही भाग आसराम कसबे यांनी साभिनय सादर केला. सहशिक्षिका पूजा चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी आभार मानले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

'एनडीए'मध्ये लोकसहभागातून थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा; लवकरच अमित शहांच्या हस्ते उद्घाटन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.