Pimpari Crime | पिंपरी-चिंचवड : जुन्या भांडणाचा राम मनात ठेवत एकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली या भागातून समोर आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.9) दुपारी साने चौकात घडला आहे. तरुणाला सिमेंटचा पत्रा व दगडाने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.
याप्रकरणी प्रतिक हनुमंत मोरे (वय 26 रा.मोरे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आनंद परदेशी, अतिश तरंगे, विकी, संकेत यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा त्याचे मित्र स्वप्नील मोरे, अक्षय लोंखडे व आकाश माने असे गप्पा मारत बसले असताना पुर्वी झालेल्या भांडणातून विकी याने दगडाने हातावर मारून हात फ्रॅक्चर केला, तर आनंद याने सिमेंटच्या पत्र्याने मारून जखमी करत शिवीगाळ केली. यामध्ये प्रतिक हा जखमी झाला आहे.
पुढिल तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!