Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये झालेल्या अपघातात ‘एमआयटी’मधील एक विद्यार्थी ठार, तर दुसरा गंभीर जखमी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 8 December 2023, 16:45
MIT student died in road accident in Loni kalbhor pune

विशाल कदम – लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर दुचाकीने टॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एमआयटी या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याचा एकवीस वर्षीय साथीदार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (ता. ०८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एमआयटी चौकात ही घटना घडली आहे.

 

अथर्व कैलास पाटोळे (वय – २१, रा. नाशिक, सध्या लोणी काळभोर, ता. हवेली) हे त्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अर्थवचा सहकारी रोहित अनिल पगार (वय – २१) हा अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व पाटोळे व रोहित पगार हे एमआयटी या शौक्षनिक संस्थेत मागील वर्षापासुन शिक्षण घेत आहेत. अथर्व हा आयटीत तर रोहित हा सीएसईत शिक्षण घेत होता. तसेच ते लोणी काळभोर येथील एका सोसायटीत दोघेही एकत्र राहतात. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एमआयटी कॉर्नरवरुन लोणी काळभोर बाजुकडे निघाले होते. कॉर्नरपासुन पुढे पन्नास फुट अंतरावर गेले असता, त्यांच्या दुचाकीने पाठीमागून ट्रक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी ही दुभाजकाला धडकून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडली. यामध्ये अथर्व व रोहित महामार्गावर पडले. यावेळी अथर्व याच्या डोक्याला जबर मार लागला, तर रोहित याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी आरती खालचे यांनी वाहतूक थांबवून रुग्णसेवेला फोन करून त्यांना लोणी काळभोर येथील रुग्णालयात पाठवले.

दरम्यान, दोघांनाही लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान अथर्व याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तसेच त्याचा साथीदार रोहित पगार याच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस कर्मचारी बालाजी बांगर यांनी भेट देऊन पंचनामा केला.

अथर्व हा वहातुक पोलिसांच्या अनास्थेचा बळी….

पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर दुचाकीने टॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघाताला वाहतूक पोलिस व त्यांची कामबद्दलची अनास्था कारणीभुत असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे. लोणी स्टेशन व एमआयटी कॉर्नर या दोन्ही ठिकाणी दिवसभर वाहतूक पोलिस तैनात करण्याबाबत वरीष्ठांच्या सुचना असतानाही पोलिस तिथे नसतात. वरील दोन्ही चौकात अपघात होणे, ही बाब नित्याचीच बनली आहे. पुणे-सोलापुर महामार्गावर एमआयटी कॉर्नरच्या दोनही बाजुला रस्त्यात वाहने उभी राहत असताना,वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

Pimpri-Chinchwad News: अग्नीतांडव! तळवडे एमआयडीसीत फटाक्याच्या कंपनीला आग; ७ जणांचा मृत्यू, १५ जण अडकले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.