Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीची कमाल! एआयद्वारे केली ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कौतुक; शरद पवारांचेही ट्विट चर्चेत..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 January 2025, 15:09

पुणे : डिजिटल भारतात सध्या एआय म्हणजेच आर्टीफिशियल इन्टेलिजन्सची चलती असून एआय तंत्रज्ञानाचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी देखील एआय तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे दिसत आहे. बारामतीमध्ये एआयचा वापर करुन ऊसाच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे, भारत दौऱ्यावर असलेल्या मायक्रोसॉप्ट कंपनीचे चेअरमन सत्या नंडेला यांनी बारामतीला भेट देऊन विशेष कौतुक केलं आहे.

 

बारामतीमधील शेतकरी सुरेश जगताप यांनी अलीकडेच ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यासाठी, बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) चे वैज्ञानिक आणि मायक्रोसॉफ्ट एआय तंत्रज्ञानाची त्यांनी मदत घेतली आहे. सत्या नाडेला यांच्याकडून या ऊस शेतीत केलेल्या प्रयोगाची दखल घेण्यात येऊन त्यांनी घेत बारामतीचं विशेष कौतुकही केलं आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करुन सत्या नाडेला यांचे आभार मानले आहेत.

एआय तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर..

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय तंत्रज्ञानावर) कृषी क्षेत्रात वापर करताना उसाची लागवड बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली आहे. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी घेतली. हा यशस्वी प्रयोगाचे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे केवीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलवडे प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण त्यांनी दिल्ली येथे याचे सादरीकरण केले. संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप असलेल्या संस्थेने घेत, चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण याचा वापर करणार असल्याचे सांगितले.

भविष्यातील शेती कशी असेल याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामतीमध्ये केला गेला आहे. राज्यातील 1000 शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ऊस या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.

दरम्यान, 16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे कृषी प्रदर्शन आयोजित आयोजित करण्यात आलं आहे. त्यामध्ये भविष्यातील शेती कशी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती केलेला ऊस आणि इतर पिके याची प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहेत. परंतु त्याआधी अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या टीमने सत्य नडेला यांना प्रेझेंटेशन दिलं.

तसेच भविष्यातील शेती कशी असेल याचा प्रात्यक्षिक बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना या प्रदर्शनादरम्यान पाहायला मिळणार आहेत. सत्या नंडेला यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केल्याने एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे सत्या नंडेला यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. त्यावर, खासदार शरद पवार यांनीही रिप्लाय करत सत्या नंडेला यांचे आभार मानले आहेत.

सत्या नाडेलांचं ट्विट काय?

‘बारामती येथील ADT टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या AI टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत’, असे ट्विट सत्या नाडेला यांनी केलं होत. त्यावर, शरद पवारांनी धन्यवाद असा रिप्लाय दिला आहे. ‘शेतीसाठी AI चे फायदे हायलाइट करण्यासाठी आपले आभार. बारामतीमधील शेतकऱ्यांना AI चा फायदा मिळवून देण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ADT सह आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच, शेती प्रयोगात तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल याची खात्री देत Microsoft सोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत’, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Student registration from 13 January for RTE admission

आरटीईसाठी विद्यार्थी नोंदणीला १३ जानेवारीपासून होणार सुरुवात; १ लाख ५ हजार ५६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.