Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात वीज खाजगीकरणाच्या विरोधात जनआंदोलन ; 17 संघटनांनी रस्त्यावर उतरून केला तीव्र विरोध

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 31 January 2025, 7:43

पुणे : वीज ग्राहकांना वीजेचा नक्की वापर कळावा, वीज बील वेळेत भरता यावे व वीजेची बचत करून वीज वापरावरील खर्च कमी करता यावा. यासाठी प्रीपेड स्मार्ट मिटर बसविण्याचा उद्देश केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहिर केले आहे. मात्र महावितरणची सध्या अस्तित्वात असलेली मिटर प्रणाली ही स्मार्टच व डिजीटल असुन वीज ग्राहकाला त्याचा दैनदिन वापर मिटर रिडींगवरून अवगत करता येतो. सरकारने महावितरणाच्या सर्व वीज ग्राहकांना सक्तीने प्रीपेड मीटर लावण्याच्या निर्णयाच्या विरोधात पुण्यात 17 संघटनांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

 

पुण्यातील रास्ता पेठेतील पॉवर हाऊस येथे काल गुरुवारी (ता.30) कामगार संघटना, सामाजिक संस्था व ग्राहकांनी जण आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबॉडीनेट इंजिनियर्स असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना (1701), म.रा. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन.

पुणे राष्ट्रीय इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियन (इंटक) आयटक, सिटू, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती पुणे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला के डरेशन, श्रमिक हक्क आंदोलन, ऑल इंडिया फोरम अगेन्स्ट करप्शन, कामगार एकता क मिटी, कम्युनिस्ट गदर पार्टी, महाऊ र्जा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, नव समाजवादी पर्याय या कामगारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, वीज ही चैनीची वस्तु नसून तीचा बेसुमार वापर करण्यामुळे वीज बील जास्तीचेच येणार एवढे समजण्याइतका महाराष्ट्रातील वीज ग्राहक हा नक्कीच सूज्ञ आहे. त्यामुळे सरकारचा हा दावा सपशेल दिशाभुल करणारा आहे.

केंद्र सरकारच्या धोरणातून व आदेशानुसार सुरु झालेली ही वाटचाल म्हणजे वीज क्षेत्र्याच्या संपूर्ण खाजगी करण्याची सुरुवात असून वीज ही अत्यावश्यक सेवा राहणार नाही. केंद्र सरकारच्या धोरणानुसार भावी काळात वीज ही खुल्या बाजार पेठेतील विक्रीची वस्तू होणार असून यात राज्यातील 2.25 कोटी वीज ग्राहक या धोरणाचा पहिला बळी ठरणार आहेत.

स्मार्ट प्रीपेड मिटर बसवण्याची योजना ही केंद्र सरकारच्या दबावामुळे राबविण्यात येत असलेली खर्चिक व वीज उद्योगाला आर्थिक आरिष्टात ढकलणारी योजना आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रामध्ये 2 कोटी 25 लाख 65 हजार स्मार्ट मिटर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेसाठी एकूण 39 हजार 603 कोटी रूपये खर्च येणार आहे. यासाठी 7 ऑगस्ट 2023 रोजी मे. अदानी, मे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. मटिकार्लो व मे. जीनस या 4 पुरवठादारांना मंजुरीपत्र दिले आहे. में. अदानी व जीनस याच कंपन्यांना या क्षेत्रातील अनुभव असून इतर दोन कंपन्यांचा वीज व मिटर या प्रणालीशी कसलाही संबंध नाही.

प्रीपेड मिटर्स ही महावितरण कंपनीच्या खर्चाने बसविण्यात येणार असल्याची शासन व कंपनी प्रशासनाची जाहिरात फसवी आहे. मिटरची किंमत 12 हजार रुपयांपैकी फक्त 900 रूपये केंद्र सरकारचे अनुदान असणार आहे. उर्वरीत 11 हजार 100 रुपये ही रक्कम ग्राहकांच्या माथी वीज दर वाढीच्या रूपाने मारली जाणार आहे. कारण कर्ज रूपाने काढण्यात येणाऱ्या 25 हजार कोटींचे व्याज व मुद्दलाची परतफेड ही वीज दरवाढ करूनच महावितरणला करणे शक्य आहे.

तसेच दरमहा मेटेनन्स चार्ज म्हणून 100 रुपये दहा वर्ष वसुल केले जाणार आहे. तसेच ग्राहकाचा संपूर्ण डेटा हा मिटर बसविणाऱ्या कंपनीकडे राहणार असून बिलींग सुध्दा मिटर पुरवठादाराच्या हातात राहणार आहे. त्यामुळे चुकीचे बील आले तर दुरुस्त कोण करणार? आणि या दरम्यान ग्राहकाला अंधारात राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेश व बिहार येथे प्रीपेड मिटर्स बसविण्यात आले असून 2 वर्षानंतरही दुप्पट तिप्पट बिलींगच्या तक्रारी आहेतच, मिटर जंपींगच्या तक्रारी आहेत. हरियाणा व राजस्थान मधील ग्राहकांनाही हाच अनुभव घ्यावा लागत आहे. खाजगी पुरवठादारांच्या यत्रंणेत काही बिघाड झाल्यास एकाच वेळी लाखो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होवू शकतो अथवा खात्यावरील सर्व रक्कम अचानक संपून शिल्लक उणे होवू शकते व असे अनुभव उत्तर प्रदेश व बिहारमध्ये आलेले आहेत. असे दिलेल्या निवेदनात पुणे वीज खाजगीकरण विरोधी जण आंदोलन समितीने म्हटले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40
Next Post

UPI युजर्ससाठी मोठी बातमी; 1 फेब्रुवारीपासून 'हे' व्यवहार होतील ब्लॉक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.