Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी सुप्रसिध्द कवी म.भा.चव्हाण यांची निवड; राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुला येथे होणार!

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 8 June 2025, 16:36

दौंड,ता.८ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे होणाऱ्या चौथ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमलेनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

 

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले यांची तर निमंत्रकपदी सुयश देशमुख व सह निमंत्रकपदी मोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष ढमाले हे गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करीत असून, आरोग्य व शिक्षण या मूलभूत घटकात अग्रेसर काम करीत आहे.

चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन १४ व १५ जून २०२५ रोजी चौफुला ता.दौंड येथे होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दीपक पवार, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे, विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, अरविंद जगताप, रामभाऊ नातू, आनंदा बारवकर, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर, कैलास शेलार, डॉ.अशोकराव जाधव, रेश्मा जाधव आदी उपस्थित होते.

भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुका आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प गट) पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार संभाजी कुंजीर, संभाजी बिर्गेडचे प्रवक्ते संतोष शिंदे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक दौंड तालुकाध्यक्ष सागर फडके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश पासलकर, तानाजी केकाण, आनंद थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका अध्यक्ष नितिन दोरगे, केशवराव जेधे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, भाऊसाहेब फडके, नितीन भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

संमेलनाध्यक्ष म.भा.चव्हाण यांची दूरदर्शन आणि चित्रपट या माध्यमातून त्यांची गीते सर्वदूर लोकांपर्यंत पोहचलेली आहे. संगीतकार राम कदम, गजानन वाटावे, चंद्रशेखर गाडगीळ, अच्युत ठाकूर, रोशन सातारकर, भीमराव पांचाळे आदी संगीतकारांनी त्यांची गीते स्वरबद्ध केलेली आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात कविता आलेल्या आहेत. पुणे विद्यापीठात ते बहिशाल व्याख्याते आहेत.

यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, मृत्युंजय स्मृती पुरस्कार, भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार आणि यु आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रेष्ठता पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. प्रेमशाळा कविता दर्शन या त्यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. पृथ्वीराज प्रकाशन ही संस्था गेली ४० ते वर्ष ते पाहत आहेत, त्यांची ‘धर्मशाळा’ ,’वाहवा’, ‘दुनिया’ आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22
Next Post

हडपसर – कल्याणीनगर मेट्रोसाठी ‘पीएमपी’ची पूरक बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.