Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार – चंद्रकांत पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 January 2023, 13:17

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनासआलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, अशा आशयाचे पत्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला घरूनच अभिवादन केले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पत्र शेअर केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर शेयर केलेले पत्र पुढील प्रमाणे…

 

 

जय भीम! pic.twitter.com/dXV6wMIWdX

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 1, 2023

“शौर्य दिनाच्या निमित्ताने, दिनांक एक जानेवारीला युद्धात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन करतो. सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना द्यावी दर्शन घ्यावे. कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना अत्यंत नम्र आवाहन.

 

बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/XDNwpZMOwc

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 1, 2023

बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक ०१ जानेवारी १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह, भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमा कोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात.

आंबेडकरांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे तिचे जाहीर प्रदर्शन करणे हा माझा स्वभाव नाही. सन १९८२ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीचे पतीतपावन मंदिर ते दादरच्या चैत्यभूमी पर्यंत एक महिनाभर चाललेल्या समता यात्रेचे नेतृत्व मी केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी शेकडो गावांमध्ये केलेल्या संवाद यात्रेचे नेतृत्वही मी केलं आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी व नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न केले. आजही, एक नाही दोन नाही कोल्हापुरातील वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये मी लहान मुलांच्या बुद्धीचा विकास करणारी ‘खेळघरे’ सुरू केली आहेत व वंचितांचा शैक्षणिक विकासासाठी मी वचनबद्ध आहे. मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सूप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता, भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रद्धेने आले असतील, येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.

आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पुर्ण होऊ देणार नाही आहे. सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.