Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरफोडी करणाऱ्या परराज्यातील सराईत टोळीला बेड्या; १३ लाखांचा ऐवज जप्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 11 January 2025, 15:04
Man arrested for having illegal pistol in khed pune

आंबेगाव : मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घोडेगाव न्यायालयाने या चार जणांना दहा दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांनी दिली आहे.

 

अलमसिंग ईस्तो बामनिया (वय ३१, रा. करवट), अवलसिंग रामसिंग भुरिया (वय ५०, रा. देवधा), चमसिंग बदरू बामनिया (वय ३९, रा. छडावद), करणसिंग कालूसिंग भुरिया (वय ३८, रा. घोडदल्या, ता. कुक्षी, जि. धार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मंचरमधील एस कॉर्नर येथील लक्ष्मीपूजन सोसायटीत चोरट्यांनी तीन बंद सदनिका फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण ७ लाख ७२ हजार रुपयांची घरफोडी केली होती. याबाबत लक्ष्मण अरुण दातखिळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत मांडवे यांनी तपास पथकाची नेमणूक केली होती.

या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांना सदरचा गुन्हा मध्य प्रदेशातील आरोपींनी केल्याचे समजले. सदर आरोपी कार (एमएच १३ झेडडी ७८५६) मधून खेडमार्गे भीमाशंकर येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सदर आरोपींनी मंचर ठाण्याच्या हद्दीत सहा, वडगाव मावळ, भोर, सासवड, पौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यामधील चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने व रोख मध्य प्रदेश येथे ठेवली असल्याचे आरोपींनी सांगितले.

सहायक पोलिस निरीक्षक बडगुजर, हवालदार संजय नाडेकर, अंमलदार अजित पवार, योगेश रोडे, हनुमंत ढोबळे यांनी मध्य प्रदेशात जाऊन ८ लाख २० हजार रुपयांचे सोने- चांदीचे दागिने, पाच लाखांची कार असा १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पूढील तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

मुळशीत पर्यटकांना लुटणाऱ्या दोघांना सात वर्षांचा कारावास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.