पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Big Breaking) पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून (Rashtrawadi Congress Jahirnama) उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांसाठी मोठी (Supriya Sule) आश्वासने दिली आहेत. पुणेकरांना मोफत मेट्रो (Sharad Pawar) आणि मोफत पीएमपीएमएल बस सेवा (Pune Mahapalika Election) देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, वाहतूक कोंडीमुळे दररोज पेट्रोलवर होणारा सुमारे 7.5 कोटी रुपयांचा खर्च वाचवून तोच पैसा सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरता येईल, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले की, पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे वर्षाला सुमारे 10800 कोटी रुपये पेट्रोलच्या स्वरूपात वाया जातात. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मेट्रो आणि बसचा वापर केल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि शहर अधिक स्वच्छ व सुरक्षित बनेल. महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे दिल्यास मोफत मेट्रो सेवा करून दाखवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जाहीरनाम्यात पाणीपुरवठ्यासाठी दररोज उच्च दाबाने पाणी देण्याचे, सर्व प्रभागांसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याचे आणि टँकर माफियांचे उच्चाटन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच झिरो-गळती पाणीपुरवठा नेटवर्क, अतिरिक्त पाणीसाठा आणि भूमिगत वाहिन्यांचे श्रेणीसुधार यावर भर देण्यात येणार आहे.
वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये 150 किलोमीटरहून अधिक रस्त्यांचा दर्जा सुधारणे, मिसिंग लिंक रोड पूर्ण करणे आणि इंटरनल रिंग रोड उभारण्याची योजना आहे. शहर स्वच्छतेसाठी 100 टक्के कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर आणि ग्रीन सोसायटी संकल्पनेवर भर देण्यात येणार आहे.

आरोग्य सुविधांसाठी 200 राजमाता जिजाऊ क्लिनिक, नवीन रुग्णालये, आयसीयू सुविधा, कर्करोग रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, 150 पुणे मॉडेल शाळा आणि सीबीएसई, आयसीएसई मानकांच्या शाळा सुरू केल्या जातील.
1 एप्रिल 2026 पासून 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाला प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणेकरांबद्दल आमचा जिव्हाळा आहे, त्यामुळे संधी द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.






