Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे सोलापूर महामार्गावर वर्षभरात तब्बल ११७ अपघात; ६० जणांचा मृत्यू तर ६१ जण गंभीर जखमी, मृत्यूंना जबाबदार कोण?

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 December 2023, 15:46

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कवडीपाट ते टोलनाका या दरम्यान अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. मागील ११ महिन्यांच्या कलावधीत झालेल्या अपघातांमध्ये ६० जणांनी आपला जीव गमावला आहे, तर सुमारे ६१ जण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघातांमध्ये काहींना आपले अवयवदेखील गमवावे लागले आहेत. नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुखकर व्हावा, प्रवासाचा वेळ वाचावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. मात्र, हेच महामार्ग अल्पावधीतच मृत्यूचे सापळे म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. यानिमित्ताने अपघातांचे प्रमाण का वाढते आहे, अजाणतेपणी होणाऱ्या या मृत्यूंना जबाबदार कोण? याची चिकित्सा करण्याची मागणी संतप्त नागरिक करत आहेत.

 

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट-टोलनाका ते यवत (ता. दौंड) दरम्यानच्या ३४ किलोमीटरच्या अंतरात सर्वाधिक अपघात होत आहेत. दैनंदिन प्रवासी वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्गावरून प्रवास करताना योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन, लोणी काळभोर कॉर्नर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी येथील गावांत जाणारा रस्ता, आळंदी म्हातोबाची, नायगाव व सोरतापवडी या ठिकाणच्या चौकात वाहनांची गर्दी नेहमीच असते. तसेच उरुळी कांचन येथील ऍलाईट चौकात आणि तळवडी चौकातून जेजुरीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दरम्यान, महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते यवत या भागातील रस्त्याचे काम आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने केले आहे. साधारणपमे १४ वर्षे या रस्त्याची टोलवसुली या कंपनीने केली आहे. मात्र, टोल बंद झाल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर महामार्गावरील सुविधा होतील अशी अपेक्षा येथील नागरिकांना होती.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

* अपघाताची कारणे
महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, लोकांनी सोयीसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्ता दुभाजक, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर घातलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर केलेले अतिक्रमण, महामार्गावर चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे आणि रस्त्यावर हॉटेल असल्यास गाडी थांबवून, मद्य पिऊन गाडी चालविणे.

* महामार्गाची दुरवस्था
१) पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेच्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.
२) रस्त्याच्या कडेला झाडे उगवली आहेत.
३) रस्त्याच्या दुतर्फा मातीचे मोठमोठे ढीग साचले आहेत.
४) महामार्गावरून जाणाऱ्या वाळूच्या ट्रकमधून पडणारी वाळू.
५) ठिकठिकाणी तुटलेले लाईट कटिंग बॅरिअर्स

* अपघाताची आकडेवारी खालीलप्रमाणे
– १ जानेवारी २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अपघातांचे तब्बल ११७ गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या अपघातात ६० जणांना मृत्यू, तर ६१ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर महामार्गावर किरकोळ असे शेकडो अपघात झालेले आहे. हे अपघात आपापसांत मिटले आहेत.

प्रशासनाने कडक कारवाई करावी
पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहेत. काही वाहनचालक रस्त्यावर गाडी पार्क करतात. तर काही व्यावसायिकांनी सेवा रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून गाडी चालविताना भीती वाटते. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी.

– ओम गंगणे (नागरिक, लोणी काळभोर)

उपाययोजना सुरू आहेत…
पुणे-सोलापूर महामार्गावर पुणे शहरात दिवसा अवजड मालवाहतुकीस बंदी आहे. त्यामुळे मालवाहतूक संध्याकाळी होत असल्याने अपघातांचे प्रमाण संध्याकाळी जास्त आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. लोणी स्टेशन चौकातील सिग्नल चालू करून घेतला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक नियमांचे सूचना फलक लावले आहेत. महामार्गावरील रस्ता दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच बेकायदेशीररित्या चालविणारे वाहनचालक व नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात आपोआप घट होईल व मृत्युचे प्रमाणही कमी होईल.

– सचिन शिंदे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, लोणी काळभोर)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
Next Post

'एक गाव, एक दिवस' उपक्रमांतर्गत दौंड तालुक्यात वीज समस्यांचे तत्काळ निराकरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.