Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवले पुलावर पुन्हा अपघात; भरधाव वेगातील डंपरची ट्रॅव्हल्सला जोरदार धडक; सात प्रवाशी जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 February 2024, 10:43

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ एका डंपरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. यात डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील सात प्रवाशी जखमी झाले. हा अपघात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.

 

नवले पुलाजवळ वारंवार अपघात होत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस आहे. येथून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स बाहेर पडत असताना मुंबईच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या भीषण अपघातात सात प्रवाशी जखमी झाले असून, ट्रॅव्हल्सचे तसेच डंपरचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मधून क्रेनच्या साह्याने बाजूला घेण्यात आली. नवले पुलावरील विचित्र उतारामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात.

नवले पुलाजवळ दोन दिवसांपूर्वी विचित्र अपघात झाला होता. एका भरधाव ट्रॅंकरने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची ही घटना घडली आहे. या अपघातात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे एका बाजूने नवले पुलावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होची. अपघात पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

शहरातील १९ अपघात प्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट) निश्चित केले आहेत. या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी वाहतूक विषयक सुधारणा करण्यासंबंधी वाहतूक पोलिसांनी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असून, त्यानुसार काही सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून रस्ते अपघातात मृत पावणाऱ्यांमध्ये ६७ टक्के दुचाकीस्वारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील मुलांसाठी २९ कोटींची गणवेश खरेदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.