Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयात अक्षता कलशाचे विधीवत पूजन

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 December 2023, 19:05
akshata kalash worship in ramdara shivalay in loni kalbhor pune

लोणी काळभोर: ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘सियावर रामचंद्रजी की जय’, ‘प्रभू श्री रामचंद्रकी जय,’ ‘जय श्री राम’, अशा विविध जयघोषात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामदरा शिवालयात अक्षता कलशाचे विधीवत पूजन १००८ श्री हेमंत पुरी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१९) करण्यात आले. यावेळी पूर्व हवेलीतील १९ गावांना कलशाचे वितरण करण्यात आले.

 

अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येत येण्यासाठी रामभक्तांना निमंत्रण देण्यासाठी अक्षता अभिमंत्रित करून अक्षता कलश लोणीकाळभोर येथील रामदरा शिवालयात आणण्यात आला होता. या अक्षता कलशांचे समरसता यज्ञ करून विधिवत पूजन करण्यात आले.

हिंदू धर्मातील विविध संप्रदायांतील एकेका दाम्पत्यास प्रातिनिधिक स्वरूपात यज्ञाला बसविण्यात आले. नंतर पुरुषांनी हे अक्षता कलश डोक्यावर घेऊन श्रीराम मंदिरात आणले. तेथे साधू-संतांनीही कलशांचे पूजन केले. त्यानंतर रामदरा शिवालय परिसरातून या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रभू श्रीरामांची मूर्ती, सनई, बँड, चौघडे तसेच भगवे ध्वजधारी रामभक्त सहभागी झाले होते. या दरम्यान, हनुमान चालीसा पठण, श्री रामाचे, हनुमानाचे नामस्मरण, जयघोष व आरती करण्यात आली. या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

रामदरा शिवालय ट्रस्टच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व हवेलीतील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून अक्षदा कलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, हा अक्षता कलश पूर्व हवेलीतील मांजरी, शेवाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, पेठ, नायगाव, आळंदी म्हातोबाची, वळती, तरडे, शिंदवणे, सोरतापवाडी, उरुळी कांचन, टिळेकर वाडी, खामगाव टेक, भवरापूर, कोरेगाव मूळ, प्रयागधाम या १९ गावांमध्ये वितरीत करण्यात आला आहे.

अक्षता कलशाचे ३१ डिसेंबरपर्यंत मिळणार भाविकांना दर्शन

अक्षता कलशाचे भाविकांना ३१ डिसेंबरपर्यंत दर्शन मिळणार आहे. त्यानंतर या कलशातील अक्षता घरोघर वितरीत करुन अयोध्येतील रामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण रामसेवक देतील. 22 जानेवारीला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी सर्व भाविकांनी जवळच्या मंदिरात हा अक्षता समर्पित करुन विविध धार्मिक कार्यक्रम करावेत.

– श्री हेमंत पुरी महाराज १००८ (श्री रामदरा शिवालय, लोणी काळभोर)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35
Next Post
Who is Sameer Rizvi, the UP star bought by CSK for Rs. 8.4 crore in IPL auction 2024?

अनकॅप्ड क्रिकेटपटूवर CSK ची 8.4 कोटींची बोली, वयाच्या 20 व्या वर्षी करोडपती झालेला समीर रिझवी आहे तरी कोण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.