Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News: सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; साखरपुडा झालेल्या जोडप्याचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 February 2026, 14:25

Accident News:  सोलापूर, दि. 22: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur-Dhule National Highway) झालेल्या भीषण अपघातात (Accident) साखरपुडा झालेल्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे या दोघांचा साखरपुडा अवघ्या 4 दिवसांपूर्वी झाला होता आणि लवकरच त्यांचा विवाह होणार होता. मात्र या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय 25) आणि इजोरा येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय 23) यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. रविवारी सकाळी अक्षया हिला लातूर येथे महापारेषणची परीक्षा द्यायची होती. त्यामुळे पहाटे वाशी येथून घरच्या कारने ते लातूरकडे निघाले होते.

सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार थेट येडशी टोल नाक्याच्या कमानीवर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला. या भीषण अपघातात अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साखरपुड्यानंतर अवघ्या काही दिवसांतच असे दुर्दैवी घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post
Minority Status Certificates: A "big game" in the name of Ajit Pawar? What happened in the ministry while granting status to 75 institutions? There is a stir as soon as the order for inquiry is issued

Minority Status Certificates: अजित पवारांच्या नावाने "मोठा गेम"? 75 संस्थांना दर्जा देताना मंत्रालयात काय घडलं? चौकशीचे आदेश येताच खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.