अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यात फेड बँकेमध्ये १ कोटी २७ लाख ७१ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शिरुर पोलिस ठाण्यात तब्बल २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार २३ नोव्हेंबर २०२२ ते २०२४ या काळात घडला आहे.

याप्रकरणी दिगबंर संदीपा फुले (वय 30 वर्षे, धंदा नोकरी (सिनीअर मॅनेजर), रा. फ्लॅट कंमाक 106, आय बिल्डिंग, गंगा कुंज सोसायटी, कळसगांव, पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी २७ जणांवर भादवी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१,४०६,१२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज प्रकरणे ही बँकेचे कर्मचारी प्रितम घोलप, शत्रुर्जय साटणकर, रूद्रा इन्टरप्रायजेसचे अजिंक्य रसाळ, व्हल्युअर सागर लोढा, फ्री लान्सर म्हणून काम करणारा आदेश साळुंखे (रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) आणि कर्जधारक व कर्जधारक, उत्तम तुकाराम नांदरे, सुनिता उत्तम नांदरे, राहुल दत्तात्रय शिंदे, दत्तोबा विष्णू शिंदी, प्रकाश मोहन धारकर, अक्षय प्रकाश धारकर, रविंद्र ताब्याबा शिंदे, कल्पना रविंद्र शिंदेला, प्रशांत अनिल गरुड, योगिता प्रशांत गरुड, गौरव बाबासाहेब नंदखिळे, बाळासाहेब रामचंद्र नंदखिळे, प्रतिभा संतोष कोंडे, संतोष बाळासाहेब कोंडे, रुषिकेश बाबूराव शिंदे, सपना रूषिकेश शिंदे वाडी, अक्षय अशोक गरुड, शोभा अशोक गरुड, शिवाजी ज्ञानदेव कोंडे, मंगल शिवाजी कोंडे (सर्व रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर, जि. पुणे), अजित जालिंदर गवळी, अश्विनी अजित गवळी (दोन्ही रा. बाबुळसर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी संगणमत व कट करून गाव नमुना 8, गांवठाण प्रमाणपत्र व कर पावती ही बनावट कागदपत्र बनवून कर्ज प्रकरणासाठी बँकेमध्ये सादर केली.
बँकेचे कर्मचारी यांनी जागेला भेट देताना त्याची खात्री न करता तसेच रूद्रा एंटरप्राइजेसचे अजिंक्य रसाळ व व्हल्युअर सागर लोढा यांनी सत्यता न तपासता खोटे व बनावट अहवाल सादर केले. त्यामुळे कर्जदार व सह कर्जदार यानी फेड बँकेकडून गैरमार्गान कर्ज रक्कम १ कोटी २७ लाख ७१ हजार प्राप्त केले आहे. वरील सर्वांनी आपआपसामध्ये संगनमत व कट करून गैरमार्गाने कर्ज प्राप्त केले व फेड बँकेची फसवणूक केली. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.







