Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरी ; नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलण्याची मोहीम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची चोख अंमलबजावणी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 18 December 2022, 18:02

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीजबिलांपोटी खंडित करू नये तसेच नादुरुस्त झालेले वितरण रोहीत्र सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तात्काळ बदलून द्यावे असे आदेश दिले आहेत. त्याची चोख अंमलबजावणी महावितरणकडून सुरु आहे.

कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहीत्र नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून सुरु आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले केवळ ६२२ नादुरुस्त रोहीत्र बदलणे शिल्लक असून ते देखील तात्काळ बदलण्यात येत आहेत. तर महावितरणकडे सद्यस्थितीत तब्बल ४ हजार १८ रोहीत्र बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध आहेत.

यामध्ये राज्यभरात दि. २९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेले ६ हजार ९२ व त्यानंतर शनिवार (दि. १७)पर्यंत नादुरुस्त झालेले ६ हजार ५१६ असे एकूण १२ हजार ६०८ नादुरुस्त रोहीत्र महावितरणकडून युद्धपातळीवर बदलण्यात आले आहेत.

 

कृषिपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणचे राज्यभरात एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहीत्र आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहीत्र दररोज बदलणे शिल्लक राहत असल्याची परिस्थिती होती. तथापि, यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहीत्र तात्काळ बदलून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कृती आराखड्याद्वारे सूक्ष्म नियोजन करून व बैठकीद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहीत्र तात्काळ बदलण्याची सक्त सूचना केली. सोबतच महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यात दौरे करून सर्व परिमंडलांचा आढावा घेत नादुरुस्त रोहीत्र बदलण्याची कार्यवाही वेगवान केली. परिणामी शनिवार (दि. १७)पर्यंत राज्यभरात मागील दोन दिवसांमध्ये बदलणे शिल्लक राहिलेल्या नादुरुस्त रोहित्रांची संख्या केवळ ६२२ असून ते देखील तात्काळ बदलण्याची कार्यवाही सुरु आहे.

दरम्यान, नादुरुस्त किंवा जळालेले वितरण रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने राज्यभरात १९३४ कंत्राटदार एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ११ हजार ६३२ रोहीत्र दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे रोहीत्रांच्या दुरुस्तीचा वेग देखील प्रचंड वाढला आहे. नादुरुस्त झालेले रोहीत्र बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ऑईलसह तब्बल ४ हजार १८ रोहीत्र सद्यस्थितीत अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

कदमवाकवस्तीच्या "सरपंच" पदी "चित्तरंजन गायकवाड विराजमान होणार की कल्पना काळभोर," मतदारांचा कौल मतदान पेटीतबंद... कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसाठी 68 टक्के मतदान, ग्रामपंचायतीची सत्ता नवपरीवर्तन राखणार की मतदारराजा परीवर्तन करणार याकडे पूर्व हवेलीसह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.