Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीच्या “सरपंच” पदी “चित्तरंजन गायकवाड विराजमान होणार की कल्पना काळभोर,” मतदारांचा कौल मतदान पेटीतबंद… कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसाठी 68 टक्के मतदान, ग्रामपंचायतीची सत्ता नवपरीवर्तन राखणार की मतदारराजा परीवर्तन करणार याकडे पूर्व हवेलीसह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 18 December 2022, 19:19

लोणी काळभोर (पुणे) – जिल्हातील सर्वात श्रीमंत व राजकीयदृष्ट्या संवेदनाशिल मानली गेलेल्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. 18) दिवसभरात 68 टक्के मतदान झाले. सरपंचपद थेट जनतेतुन निवडला जाणार असल्याने, कदमवाकवस्तीच्या सरपंच पदी नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड की जनसेवा पॅनेलच्या कल्पना काळभोर यांची वर्णी लागणार याचा कौल मतदारपेटीत बंदीस्त झाला आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सतरा जागांच्यासाठी मतदान रविवारी (ता.१८) पार पडले असुन, कदमवाकवस्तीचे एकूण मतदान १८९२८ असुन, त्यापैकी दिवसभरात सहा प्रभागासाठी मिळुन १२८४९ मतदान झाले. स्वारगेट येथील गणेश कलाक्रिडा भवनात मंगळवारी (ता. २०) मतमोजनी होणार आहे.

मतमोजनीनंतरच कदमवाकवस्तीच्या सरपंच पदी नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड व जनसेवा पॅनेलच्या कल्पना काळभोर या दोघांच्यापैकी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे समजणार आहे. तर सरपंचपदाबरोबरच सतरा जागांच्यासाठीची मतमोजनीही त्याचवेळी होणार असल्याने, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची येणार याचाही फैसला मंगळवारी होणार आहे.

 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षापासुन भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या गटाची सत्ता असुन, पाच वर्षापुर्वी चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी, गौरी गायकवाड सरपंच म्हणुन थेट जनतेतुन निवडुन आल्या होत्या.

मागील निवडणुकीप्रमानेच ग्रामपंचायतीची सत्ता पुढील पाच वर्षासाठीही आपल्याच हाती रहावी यासाठी या निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड यांच्या नेतृ्त्वाखाली नवपरीवर्तन पॅनेलच्या माध्यमातुन स्वतः चित्तरंजन गायकवाड सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर त्यांनी 17 जागांच्यासाठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यासाठी चित्तरंजन गायकवाड व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील वर्षभरापासुन फिल्डींग लावली होती.

निवडणुक जाहीर झाल्यापासुन, सरपंचपदासह ग्रामपंचायतही आपल्याच ताब्यात रहावी यासाठी चित्तरंजन गायकवाड व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील पंधरा दिवसाच्या काळात साम-दाम-दंड ही तिन्ही आयुध्दे वापरुन प्रचारात आघाडी घेतली होती.

तर दुसरीकडे चित्तरंजन गायकवाड यांच्या ताब्यातुन ग्रामपंचायतीची सत्ता हिसकावुन घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते प्रविण काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर व माजी सरपंच ऋुषी काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन, जनसेवा पॅनेलच्या माध्यमातुन सरपंचपदासह सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

सरपंचपदासाठी विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी, कल्पना काळभोर यांना चित्तरंजन गायकवाड यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ग्रामपंचायतीच्या राजकारणात परीवर्तन करायचेच या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नंदु काळभोर, प्रविण काळभोर, बाबासाहेब काळभोर व ऋुषी काळभोर यांनी मागील पंधरा दिवसाच्या काळात साम-दाम-दंड ही तिन्ही आयुध्दे वापरुन चित्तरंजन गायकवाड यांच्या समोर आव्हान उभे केले होते.

प्रत्यक्ष प्रचारादरम्यान सरपंचपदासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी, पारंपारिक प्रचाराला आधुनिकतेची जोड दिल्याने प्रचाराची रंगत वाढली होती. सर्वच पॅनेल प्रमुख व उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे मोठ्या प्रमाणांत पैशाचा वापर करून मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न यावेळी केला.

रविवारी सकाळपासुन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मताचे दान आपल्यालाच मिळावे यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते धावपळ करत होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे आढळून आले. अपंग व वृद्ध मतदारांनाही आणण्यासाठी चढाओढ लागली होती. सायंकाळी साडेपाचनंतरही मतदारांना आणण्याचा सपाटा चालूच होता.

दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदानाच्या वेळी ग्रामपंचायत हद्दीच चोख बंदोबस्त लावल्यामुळे, दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मोठ्या मताधिक्कयाने “आपण” च विजयी होणार…

चित्तरंजन गायकवाड व कल्पना काळभोर या दोन्ही सरपंचपदाच्या उमेदवारासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ३७ उमेदवारांनी, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजनेच्या मतदान संपताच आपणच कसे मोठ्या मताधिक्कयाने आपणच विजयी होणार असा दावा करीत होते. मात्र मतदानाची टक्केवारी पहाता, मतासाठी मोठी माया देऊनही, बहुसंख्य मतदारांनी उमेदवारांना आपल्यापासुन थोडे दूरच ठेवल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही पॅनेलच्या खर्चाचा विचार केल्यस, किमान आठ ते दहा कोटीची “माया” हवेत उडाल्याची चर्चा आहे.

मतदारांना दिलेल्या मायेच्या जोरावर “मोठ्या मताधिक्कयाने आपणच विजयी होणार” असा जाहीररित्या दावा करणारे खाजगीत मात्र तोंड टाकुन काळजी करत असल्याचे दिसुन येत होते. सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चित्तरंजन गायकवाड व कल्पना काळभोर यांच्यासह त्यांच्या समवतचे उमेदवार “मोठ्या मताधिक्कयाने “आपण” च विजयी होणार” अशा कितीही डेंग्या मारत असले तरी, मंगळवारी म्हणजेच मतमोजनीच्या दिवसीच कोण निवडुन येणार व कोण पडणार हे जनतेला खुद्द उमेदवारांनाही समजणार आहे.
प्रभागनिहाय झालेले मतदान (एकुण मतदान- प्रत्यक्ष झालेले मतदान).
प्रभाग १ – (३३८५ – २४०३) , प्रभाग २- (१९०१ – १४१५), प्रभाग- (१८५५ – ११२२), प्रभाग ४- (२६५८ – १८५२), प्रभाग ५ – (४११४ – २८४६), प्रभाग ६- (५१०५ – ३२११)

एकूण मतदान १८९२८ – झालेले मतदान १२८४९, एकूण मतदान ६७.९१ टक्के

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Tall building caught with fire in goregaon mumbai

धायरी येथे घरगुती गॅस सिलेंडर बदलत असताना गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत पती-पत्नी जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.