Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवप्रताप दिनी प्रतापगडावर हजर न होता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले कबरी समोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश….!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 10 November 2022, 12:48

अजित जगताप 

प्रतापगड : महाराष्ट्रात भाजपसोबत युती करून सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवप्रतापदिना निमित्त प्रतापगडावर हजर राहण्याबाबत शिवसेना (शिंदे गट) सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मंत्रालयात जाऊन निमंत्रण दिले. परंतु, शिवप्रताप दिनी प्रतापगडावर हजर न होता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले कबरी समोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

मार्गशीर्ष शुध्द सप्तमी शके १५८१ गुरुवार दि. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध करुन महाराष्ट्राला संकटमुक्त केले. हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनातील सर्वोच्य पराक्रम असून हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्यदिन होता. या शुभदिनी प्रतापगडावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्सव ही पंधरा वर्षापासून सुरु असलेली परंपरा आहे. तथापि त्यामुळे शिवकार्याबाबत जनतेला संदेश देण्याची महत्वाची संधी अद्यापि उपयोगात आणलेली नाही. अशी भावना शिवप्रेमींनी झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे मूळ निवासस्थान प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे, त्यामुळे यंदा प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, ही महाराष्ट्रातील समस्त शिवभक्तांच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात आली होती.

 

शिवप्रतापदिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये शिवप्रतापदिन साजरा करण्याचा आदेश देऊन मंत्रालयात त्यादिवशी शिवप्रतिमेचे पूजन भव्यतेने व्हावे, ही सुध्दा सर्व शिवभक्तांची इच्छा आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धर्मवीर संभाजी महाराजांची प्रतिमा समितीच्या वतीने देण्यात आली. शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीने मिलिंद एकबोटे, पुरुषोत्तम जाधव, शिवप्रतापगड उत्सव समिती अध्यक्ष संजय भोसले आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या वतीने विनंती करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्री शिंदे प्रतापगडावर उपस्थित राहू शकले नाहीत. गेली अनेक वर्षे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरी भोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. स्थानिक व जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी कारवाई केली नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला. आज सकाळ पासून प्रतापगड परिसरात अतिक्रमण काढताना स्वतः पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, प्रतापगडावर अफजलखान सारख्या बलाढ्य शत्रूचा वाघनख्याने कोथळा बाहेर काढला होता. ही वाघ नखे रुस्तुमे जमान याने बनवून दिली होती. अफजलखानचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केल्यानंतर कुलकर्णी यांना सुध्दा यमसदनी पाठविण्यात आले होते. त्यामुळे प्रतापगड म्हणजे ऐतिहासिक वास्तू नसून छत्रपती शिवराय यांच्या समतेची शिकवण देणारी व अन्यायाविरुद्ध लढणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. त्याचे स्मरण नेहमीच होत आहे अशी प्रतिक्रिया शिवप्रेमी अमर गायकवाड, इम्रान बागवान,सुरेश मोरे यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Breaking News : प्रेमप्रकरणातून तरुणीवर भरदिवसा चाकूने वार करणाऱ्या संशयित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.