Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Delhi Blast: दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा कट कोणी रचला? मास्टरमाईंडचा फोटो समोर… 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 11 November 2025, 13:08
Delhi Blast: Who plotted the Delhi bomb blast? Mastermind's photo in front...

Delhi Blast Update: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात सोमवारी सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटाला एका चालत्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने देशाला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. स्फोटामुळे परिसरातील अनेक वाहने जळून खाक झाली होती.

 

या भीषण बॉम्बस्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत असताना, स्फोटाचा कथित मास्टरमाईंड म्हणून डॉ. उमर मोहम्मद  याच्याकडे संशयाची सुई वळली आहे. स्फोट घडवून आणणाऱ्या या संशयित दहशतवाद्याचा पहिला फोटो आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.

 मास्टरमाईंड डॉ. उमर मोहम्मद कोण?

समोर आलेल्या माहितीनुसार डॉ. उमर मोहम्मद हा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी आहे. तो फरिदाबाद येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता. तो ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ शी जोडलेला होता. स्फोटापूर्वीच हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राथर आणि डॉ. मुजम्मिल शकील या त्याच्या दोन जवळच्या साथीदारांना अटक केली होती.

या साथीदारांना अटक झाल्याची माहिती मिळताच उमर घाबरला आणि पुरावे नष्ट करण्याच्या किंवा कट पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याने कारमध्ये डेटोनेटर बसवून स्फोट घडवला. त्याने हा संपूर्ण कट अन्य दोन साथीदारांच्या मदतीने रचला होता. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार,  स्फोट घडवून आणताना डॉ. उमर मोहम्मद याने स्वतःलाही उडवून घेतले असावे, असा संशय तपास यंत्रणांना आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून तोच कार चालवत असल्याचे दिसून आले आहे.

पुलवामा कनेक्शन समोर

या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. स्फोटात वापरलेली i20 कार ट्रॅक केली असता, ती मूळतः हरियाणातील एका व्यक्तीची होती आणि ती अनेक हातांमधून जात अखेरीस पुलवामा येथील रहिवासी असलेल्या तारिक नावाच्या व्यक्तीकडून डॉ. उमर मोहम्मद याने घेतली होती, असे उघड झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पुलवामा येथून डॉ. उमर मोहम्मदच्या दोन सख्ख्या भावांना देखील चौकशीसाठी अटक केली आहे. बॉम्बस्फोटामागचे नेमके कारण काय होते आणि यामागे आणखी किती मोठे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे, याचा सखोल तपास सध्या सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
Next Post
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Pune Crime: PMPML च्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारण आलं समोर.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.