Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ali Khamenei Killed : शमखानींची ‘ती’ एक चूक आणि खामेनेईंचा गेम ओव्हर; इस्रायलचं थरारक मिशन!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 15:38
Ali Khamenei Killed

photo- social media

Ali Khamenei Killed : मध्यपूर्वेतील संघर्षाने आतापर्यंतचं सर्वात भीषण वळण घेतलं असून, जगाचा नकाशा बदलू शकेल अशी घटना घडली आहे. शनिवारी सकाळी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात केवळ खामेनेईच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीय आणि इराणच्या लष्करातील (IRGC) बडे अधिकारीही ठार झाले आहेत. या घटनेमुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

 

नेमकं काय घडलं?

शनिवारी, 28 February रोजी पहाटे इस्रायली लढाऊ विमानांनी तेहरानमधील खामेनेईंच्या निवासस्थानाला आणि लष्करी मुख्यालयाला लक्ष्य केलं. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा खामेनेई हे त्यांच्या खास ‘अंडरग्राउंड’ बंकरमध्ये वरिष्ठ सल्लागारांसोबत एक उच्चस्तरीय गुप्त बैठक घेत होते. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, इस्रायलने या एकाच इमारतीवर तब्बल 30 बंकर-बस्टर बॉम्ब डागले. या भीषण स्फोटात खामेनेईंसह त्यांचे जावई, मुलगी, नातू आणि सून यांचाही जागीच मृत्यू झाला. तसेच IRGC प्रमुख मेजर जनरल मोहम्मद पाकपोर हे देखील या हल्ल्यात मारले गेले आहेत.

‘मोसाद’चं ते ‘एक’ ट्रेसिंग आणि खामेनेईंचा अंत

खामेनेई हे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक जीवनातून गायब होते आणि अत्यंत सुरक्षित अशा गुप्त ठिकाणी लपून बसले होते. मात्र, इस्रायलची गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ त्यांच्या मागावर होती. मोसादने खामेनेईंचे सुरक्षा सल्लागार शमखानी यांना ट्रॅक करण्यास सुरुवात केली होती. खरे तर हा हल्ला शनिवारी रात्री होणार होता, पण मोसादला माहिती मिळाली की शमखानी हे सकाळीच एका तातडीच्या बैठकीसाठी खामेनेईंच्या गुप्त निवासस्थानी पोहोचले आहेत. तिथे खामेनेई स्वतः उपस्थित असल्याची खात्री पटताच, इस्रायलने रात्रीची वाट न पाहता सकाळीच ‘ऑपरेशन’ फत्ते केलं.

पार्श्वभूमी आणि युद्धाचे पडसाद

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष गेल्या काही दशकांपासून धगधगत आहे. इराणकडून हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना मिळणारी मदत आणि इस्रायलवर होणारे रॉकेट हल्ले यांमुळे हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. अमेरिकेने थेट या युद्धात उडी घेतल्याने आता इराणचे मित्र देश (रशिया आणि चीन) काय भूमिका घेतात, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचा भाग्योदय! आज चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; वाचा शनिवारचे संपूर्ण राशीभविष्य

Saturday, 11 April 2026, 7:35

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
Next Post

Beed Crime : सोनाराच्या डोळ्यात चटणी... अन् डोळ्यादेखत लाखोंची लूट! बीड पोलिसांच्या थरारक कारवाईत 'त्या' गँगचा खळबळजनक पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.