Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डिझेलमध्ये मिसळणार 15% खास इंधन! गडकरींचा असा प्लॅन, भारताचे कोट्यवधी रुपये वाचणार?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 November 2026, 9:21

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पर्यायी इंधनाच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या प्रयोगानंतर आता डिझेलमध्येही जैवइंधनाचा वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटॅनॉल मिसळण्याचे प्रयोग यशस्वी होत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी शेतीतून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा वापर करून इंधन निर्मिती करण्याच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळू शकतो. तसेच परदेशातून इंधन आयात करण्याची गरजही कमी होण्यास मदत होईल.

उसापासून तयार होणार पर्यायी इंधन

ऊस, तांदूळ, मका आणि बांबू यांसारख्या कृषी उत्पादनांचा वापर जैवइंधन तयार करण्यासाठी केला जातो. आता उसाच्या रसापासून इथेनॉलसोबत आयसोब्युटोनॉल तयार करण्याचे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटोनॉल मिसळण्याच्या चाचण्या सुरू असून, भविष्यात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आहे. या इंधनावर चालणारी इंजिने विकसित करण्याचे कामही सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

केवळ वाहनांसाठीच नव्हे, तर विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनातही जैवइंधन मिसळण्यावर जगभरात संशोधन सुरू आहे. विमान इंधनात इथेनॉलचा वापर करण्याबाबत विविध देशांमध्ये प्रयोग केले जात आहेत.

युरिया निर्मितीतून आयात खर्च वाचणार?

कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनचा वापर करून युरिया तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामुळे भारताचा युरिया आयातीवरील मोठा खर्च कमी होऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरासाठी एनटीपीसीने निविदाही काढली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

याशिवाय डायमेथिल ईथर (DME) हे इंधन एलपीजीला पर्याय ठरू शकते. एलपीजीमध्ये डीएमई मिसळून वापरण्याची शक्यता असून, यामुळे परदेशातून गॅस आयात करण्यावरील अवलंबित्व कमी होऊ शकते. शेतीतील संसाधनांचा वापर करून इंधन निर्मिती वाढवणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवणे, हे या प्रयत्नांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोलापुरात कार-कंटेनरचा भीषण अपघात; ८ वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Friday, 6 November 2026, 19:26

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; मुलाची स्वतंत्र तपास यंत्रणेकडे चौकशी सोपवण्याची मागणी, हायकोर्टाने तातडीची सुनावणी नाकारली

Friday, 6 November 2026, 18:37

दिवाळीची मोठी भेट! फडणवीस सरकारचा 9 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टीचा निर्णय; 7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत सलग 5 दिवस सुट्या, काय बंद राहणार?

Friday, 6 November 2026, 18:32

पुणे मेट्रोला पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रतिसाद! जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी

Friday, 6 November 2026, 17:55

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17
Next Post

सोन्याचे भाव आणखी कोसळणार? एका झटक्यात स्वस्त होऊ शकतं सोनं; पाहा नवा अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp