Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Zilha Parishad Election: मोठी बातमी..! राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात; 28 जानेवारीला मतदानाची शक्यता

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 2 January 2026, 14:49

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला आहे. प्रचारासाठी आता अवघे 10 ते १२ दिवस शिल्लक राहिले असून, दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 28 जानेवारीला जिल्हा परिषदेची निवडणूक (Zilha Parishad Election)  पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

6 व 7 जानेवारी रोजी आयोगाची महत्त्वाची बैठकीची शक्यता

31 जानेवारी पर्यंत राज्यातील  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.  त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा ठरवण्यासाठी 6 व 7 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला संबंधित जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

आयोगाच्या बैठकीतच मतदानाच्या अंतिम तारखांवर शिक्कामोर्तब

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक  ईव्हीएम उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे.  मात्र, सध्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहे. हे मनुष्यबळ मोकळे झाल्यानंतरच जिल्हा परिषदांसाठी मतदान प्रक्रिया राबवली  जाऊ शकते. त्यामुळे 7 व 8 तारखेला होणाऱ्या आयोगाच्या बैठकीतच मतदानाच्या अंतिम तारखांवर  शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्येच  निवडणुका

सध्या राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्येच   निवडणुक घेता येणार आहे. राज्यातल्या अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. या ठिकाणी इतर समाजघटकांनाही निवडणूक लढता यावी त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 25 जानेवारीच्या आसपास मतदान होऊ शकते असे बोलले जात आहे.  महानगर पालिकेच्या आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन मतदानाच्या तारखा निश्चित केल्या जातील अशी शक्यता आहे.  25 जानेवारीला शक्य नसेल तर मग 28 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Teacher Recruitment: The sword of consensus hanging over teachers' salaries! Schools face 'deadline' tension before the mega recruitment of May 2026; Orders to withhold salaries

Teacher Recruitment : शिक्षकांच्या पगारावर संचमान्यतेची टांगती तलवार! मे 2026च्या मेगा भरतीपूर्वी शाळांना 'डेडलाईन'चं टेन्शन; पगार रोखण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.